नवी दिल्ली : देशात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. मागील २४ तासात देशात ९१४ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहे. त्यामुळे देशात कोरोनाबाधितांचा आकडा १२ हजार ३८० वर पोहचला आहे. मागील २४ तासात देशात ३७ जणांचा मृत्यू झाला आहे. तर, आतापर्यंत ४१४ जणांचा मृत्यू झाला आहे. आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अग्रवाल यांनी गुरुवारी सांगितले कि, मागील २४ तासात देशात ९४१ कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. तर ३७ जणांचा मृत्यू झाला आहे.
दरम्यान, देशात ३२५ जिल्ह्यात आतपर्यंत एकही कोरोनाबाधित रुग्ण आढळेल नाही.
पुढे बोलताना ते म्हणाले कि, वैद्यकीय पुरवठा करण्यासाठी उद्योगांना ‘मेक इन इंडिया’ वर लक्ष केंद्रित करण्यास सांगितले गेले आहे. जगभरात कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. जगभरात या विषाणूचे २० लाखाहून अधिक रुग्ण आहेत. तर, या विषाणूमुळे आतापर्यंत २७ हजारांपेक्षा जास्त जणांचा मृत्यू झाला आहे. तर दुसरीकडे ४ लाख ८६ हजारांपेक्षा जास्त कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत. मागील २४ तासात अमेरिकेत २ हजार ६०० कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत अमेरिकेत २५ हजारांपेक्षा जास्त जणांचा कोरोना विषाणूने बळी घेतला आहे.

अधिक वाचा  दादा खडकवासला आपणच विजयी करु शकतो; इच्छुकांसह पदाधिकाऱ्यांचे अजितदादांना निवेदन