आज चौथ्या टप्प्यातील निवडणुकांच्या प्रचाराच्या तोफा थंडावणार आहेत. तसंच पुणे लोकसभेची निवडणूक दिवसेंदिवस रंगत वाढू लागलीये. त्यामुळे आता भाजपकडून पुण्याचा गड राखण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मुरलीधर मोहोळांसाठी निवडणुकीची सूत्र फडणवीसांनी स्वत:कडे घेतलीय. काल रात्री फडणवीस पुण्यात मुक्कामी आहेत. तर आज प्रचाराचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे आता भाजपच्या हालचालींना वेग आल्याचं चित्र आहे. तसंच आज संध्याकाळी 5 वाजता मुरलीधर मोहोळ यांच्यासाठी फडणवीसांची प्रचार सांगता सभा होणार आहे.
शुक्रवारी रात्री उशीरापर्यंत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह पुण्यातील भाजप नेत्यांसह त्यांच्या बैठका सुरु होत्या. आज प्रचाराच्या शेवटच्या दिवशी देखील देवेंद्र फडणवीस यांच्या बैठकांच सत्र सकाळपासून सुरु राहणार आहे. दुपारी तीन वाजता देवेंद्र फडणवीस यांचा पुणे श्रमिक पत्रकार संघात वार्तालप होणार असून त्यानंतर मुरलीधर मोहळ यांच्यासाठी ते पाच वाजता प्रचाराची सांगता सभा गोखले नगरमध्ये घेणार आहेत.
पुणे- पिंपरीत सभांचा धडाका
हडपसरमध्ये अमोल कोल्हे यांच्यासठी शरद पवार आणि आदित्य ठाकरे यांची एकत्रित सभा होणार आहे. श्रीरंग बारणे यांच्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासाठी पिंपरी चिंचवडमध्ये रोड शो होणार आहे. अमोल कोल्हे यांचा नारायणगावमधे सकाळपासून प्रचार होणार आहे. मुरलीधर मोहळ यांच्यासाठी नितिन गडकरी यांची सभा आहे. रवींद्र धंगेकर यांच्यासाठी सुप्रिया सुळेंचा रोड शो होणार आहे. अजित पवार यांची आढळराव पाटील यांच्यासाठी तीन वाजता खेडमधे सांगता सभा होणार आहे. अमोल कोल्हे यांच्यासाठ जयंत पाटील यांची नारायणगावमधे सांगता सभा होणार आहे.