देशात काँग्रेसची भारत जोडो न्याय यात्रा राहुल गांधी यांनी सुरु केली आहे. ही यात्रा गुजरातनंतर नंदुरबार जिल्ह्यामध्ये प्रवेश करत लवकरच महाराष्ट्रात येणार आहे. काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी या यात्रेच्या महाराष्ट्रातील कार्यक्रमाबाबत माहिती दिली आहे. दि. 12 रोजी गुजरातनंतर नंदुरबार जिल्ह्यामध्ये प्रवेश करत आहे.

त्यानंतर धुळे, मालेगाव, नाशिक आणि आपल्या या मार्गाने जे वाडा मार्गाने ते आपल्याकडे येते आहे. दि. 16 रोजी सकाळी सुरुवात झाल्यानंतर भिवंडीच्या मुक्कामातच ते जनतेशी संवाद साधतील. ठाण्यातील जांभळी नाका येथे सकाळी राहुल गांधी यांची स्टेज नसणारी सभा होणार असल्याचे यावेळी थोरात यांनी सांगितले.

अधिक वाचा  सर्वात मोठी बातमी, इंडिया आघाडीचं शिष्टमंडळ उद्या राष्ट्रपतींना भेटणार, पडद्यामागे नेमकं काय घडतंय?

मुंबईत दि. 17 रोजी आघाडीची सार्वत्रिक मीटिंग घेण्यात येणार आहे. देशात सुरु असलेल्या अन्यायाचे वातावरण सुरू आहे, त्यासाठी ही विशेष यात्रा काढण्यात आली आहे. 2014 पासून मोदी सरकार देशात काम करत आहे, देशापुढे अनेक प्रश्न आहेत. त्यातून लोकशाहीवर आघात होत आहे. या सर्व गोष्टीवरती न्याय मागणारी ही न्याय यात्रा आहे, असे बाळासाहेब थोरात यांनी सांगितलं आहे. भारत जोडो न्याय यात्रा ही मुलुंडला थांबणार दादर चैत्यभूमी या ठिकाणी समारोप असणार आहे.

भारतीय जनता पक्षाची राजकारण आणि सत्ता डोळ्यासमोर ठेवून काम करत असल्याची कार्यपद्धती दिसत आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अनेक सभा सुरू आहे. मात्र मणिपूरमध्ये जाऊ शकले नाही, असे ते म्हणाले. ज्या ठिकाणी अडचणी आहेत. त्या ठिकाणी लक्ष देणं गरजेचं आहे. रॅलीमध्ये आणि पब्लिक मिटिंगसाठी मित्र पक्षांना आम्ही आमंत्रण दिलं आहे, असे थोरात यांनी सांगितले. देश हा सर्वांचा आहे. राहुल गांधी ठाण्यात संवाद साधणार आहेत. तरुण पिढी मोठ्या संख्येने उपस्थित राहिल असेही थोरात यांनी सांगितले.

अधिक वाचा  बारामती मतदारसंघात खडकवासल्यात दिवसभर तणाव अन् मध्यरात्री हवेत गोळीबार; पोलिसांचा पाठलाग पण आरोपी भरार

राज्यात येत असलेल्या भारत जोडो न्याय यात्रेत राहुल गांधी दि. 16 रोजी ठाण्यातील जांभळी नाका येथे जनतेशी संवाद साधणार आहेत. भिवंडीतुन याची सुरुवात होणार आहे. मणिपूरमध्ये जे घडलं ते वाईट आहे. देशात महागाई वाढलेली आहे. सत्ताधाऱ्यांमध्ये दंगल सुरू आहे. हे जनतेला आणि सर्वांनाच दिसत आहे, महागाईच्या विरोधात न्याय यात्रा काम करत आहे. लोकशाही टिकावी यासाठी ही न्याय यात्रा असल्याचे थोरात यांनी म्हटले आहे.