पुणे : फुकटची बिर्याणी मागणा-या पोलीस अधिका-यांवर कारवाई करा, कारवाई करा… स्वत:च्या अधिकाराचा गैरवापर करणा-या पोलीस अधिका-यांचा धिक्कार असो… अशा घोषणा देत पतित पावन संघटनेच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ‘फुकट बिर्याणी’ प्रकरणातील पोलीस अधिका-यांचा निषेध केला. तसेच याविषयी चौकशी करुन कडक कारवाई करण्याची मागणी देखील करण्यात आली.

राजाभाऊ पाटिल,सिताराम खाड़ें, राजेश मोटे, दिनेश भिलारे, विश्वास मनेरे, श्रीकांत शिळीमकर, मनोज नायर, गोकुळ शेलार, स्वप्नील नाईक, मनोज पवार, संतोष शेंडगे, धनंजय क्षीरसागर, गुरु कोळी, अशोक परदेशी,गणेश जाधव, अरविंद परदेशी, बाळा कांबळे, योगेश वाडेकर, यादव पुजारी, राहुल शिंदे, विजय क्षीरसागर, सौरभ पवार, अनिकेत बांदल, अमर काकड़े, सूरज पोटे, विश्वनाथ येमूल यांच्यासह आंदोलनात अनेक कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला.

अधिक वाचा  अनिल अंबानी अडचणीत? रिझर्व बँकेने सुरू केली कायदेशीर प्रक्रिया

प्रसारमाध्यमे व समाजमाध्यमांवरुन एक आॅडिओ क्लिप सर्वत्र व्हायरल होत असून यामध्ये फुकटची बिर्याणी व इतर गोष्टींची मागणी केल्याचे दिसून आले आहे. हा प्रकार पोलिसांची प्रतिमा मलिन करणारा असून अतिशय लज्जास्पद आहे. यामुळे पोलिसांच्या प्रतिमेला देखील काळे फासले जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे या प्रकरणाशी संबंधित पोलीस अधिका-यांवर त्वरीत कारवाई करण्यात यावी. तसेच नि:पक्षपाती चौकशी करुन दोषींचे निलंबन व्हावे, अशी मागणी संघटनेतर्फे करण्यात आली आहे.