साताऱ्यातील वाढत्या तापमानामुळे महाराष्ट्र केसरी स्पर्धेतील सकाळच्या सत्रातील सामने पुढे ढकलण्यात आले आहेत. हे सर्व सामने संध्याकाळी पाचनंतर घेतले जाणार आहेत. कोरोनामुळे गेले दोन वर्ष जणू काही सारं विश्वच थांबलं होतं. याचा फटका महाराष्ट्र केसरी स्पर्धेलाही बसला होता. तब्बल दोन वर्षांनंतर ही स्पर्धा होत आहे.
पण यंदा या स्पर्धेत कोरोना नाहीतर वाढतं तापमान अडसर ठरलं आहे. साताऱ्यातील वाढत्या तापमानामुळे महाराष्ट्र केसरी स्पर्धेतील सकाळच्या सत्रातील सामने पुढे ढकलण्यात आले आहेत. हे सर्व सामने संध्याकाळी पाचनंतर घेतले जाणार आहेत.