केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा शनिवार डिसेंबरचा गडचिरोली जिल्हा दौरा प्रस्तावित कार्यक्रम तूर्त रद्द करण्यात आला आहे. शाहयांच्या दौऱ्याची पुढील तारीख मिळाल्यानंतर हे कार्यक्रम ठरविले जातील, अशी माहिती खासदार अशोक नेते यांनी दिल्ली येथीलकार्यालयातून दिली.

जिल्ह्यातील विविध विकास कामांचे प्रकल्पाचे भूमिपूजन, कोनसरी येथील लोहप्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन आणि दुसऱ्याटप्प्याचे भूमिपूजन, तसेच वडसागडचिरोली रेल्वे लाइनच्या कामाचे भूमिपूजन, चिचडोह बॅरेजचे लोकार्पण केंद्रीय गृहमंत्री अमित शाहयांच्या हस्ते होणार होते.

अधिक वाचा  नाशिकमध्ये पडद्याआड मोठ्या घडामोडी! 1 मिनिट बाकी अन् उमेदवाराची माघार पण… तरीही महायुतीला टेन्शनच