मोहम्मद नबी आणि नूर अहमद यांच्या जादुई फिरकीनंतर रहमत शाह आणि हशमतुल्ला शाहिदीच्या शानदार फलंदाजीच्या जोरावर अफगाणिस्तानने नेदरलँड्सचा सात विकेट्स राखून पराभव केला. अफगाणिस्तानचा या विश्वचषकातील हा चौथा विजय आहे. यासह ती पॉइंट टेबलमध्ये पाचव्या स्थानावर आली असून तिने सेमीफायनलसाठीही दावा केला आहे.

अफगाणिस्तान सेमीफायनलचा दावेदार

अफगाणिस्तानचा विजयी चौकार झाल्याने पाँईंट टेबलमध्येही मोठा बदल झाला आहे. भारताने सेमीफायनल निश्चित केली आहे. दक्षिण आफ्रिकाही 12 गुणांसह दुसऱ्या स्थानावर असल्याने ते सुद्धा दावेदार आहेत. मात्र, उर्वरित दोन स्थानांसाठी मोठी चुरस निर्माण झाली आहे.

अधिक वाचा  दिल्ली सरकारचा कारभार जवळपास ठप्प; हायकोर्टाने खडेबोल सुनावत दाखवला आयना

उद्याच्या सामन्यात इंग्लंडने ऑस्ट्रेलियाला नमवल्यास आणि न्यूझीलंडने पाकिस्तानला नमवल्यास आणि अफगाणिस्तानने पुढील दोन सामने जिंकल्यास वर्ल्डकपची सेमीफायनल गाठू शकतात. त्यामुळे पाकिस्तान, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडसाठी विजय क्रमप्राप्त आहे.

लखनऊमध्ये खेळल्या गेलेल्या या सामन्यात नेदरलँड संघ प्रथम खेळून केवळ 179 धावाच करू शकला. प्रत्युत्तरात अफगाणिस्तानने अवघ्या 31.3 षटकांत तीन विकेट्स गमावून लक्ष्याचा सहज पाठलाग केला. अफगाणिस्तानचा या विश्वचषकातील हा सलग तिसरा विजय आहे. नेदरलँड्सपूर्वी अफगाणिस्तानने पाकिस्तान आणि श्रीलंकेचा पराभव केला होता.

लखनौमध्ये खेळल्या गेलेल्या या सामन्यात नेदरलँड संघ प्रथम खेळून केवळ 179 धावाच करू शकला. प्रत्युत्तरात अफगाणिस्तानने अवघ्या 31.3 षटकांत तीन विकेट्स गमावून लक्ष्याचा सहज पाठलाग केला.

अधिक वाचा  लोकसभेची रणधुमाळी, साताऱ्यात नरेंद्र मोदी अन् शरद पवार आमनेसामने, सभेकडे सर्वांचे लक्ष

अफगाणिस्तानचा या विश्वचषकातील हा सलग तिसरा विजय आहे. नेदरलँड्सपूर्वी अफगाणिस्तानने पाकिस्तान आणि श्रीलंकेचा पराभव केला होता.