नवी दिल्ली: श्री राम जन्मभूमी तिर्थ क्षेत्र ट्रस्टला आता परदेशातून निधी मिळवण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.केंद्रीय गृहमंत्रालयाने याबाबत मंजुरी दिल्याची माहिती मिळत आहे. उत्तर प्रदेशच्या अयोध्यामध्ये राम मंदिर उभारणीचे कार्य सुरु आहे. मंदिराच्या बांधकामासाठी आता परदेशातून निधी घेता येणार आहे. ‘हिंदूस्तान टाईम्स’ने यासंदर्भातील बातमी दिली आहे.

ट्रस्टला Foreign Contribution Regulation Act (FCRA) नुसार परदेशी व्यक्तीकडून निधी स्विकारण्यास परवानगी देण्यात आली आहे. ट्रस्टने एक्सवर माहिती दिली की, गृह मंत्रालयाच्या FCRA सेक्शनने ‘श्री राम जन्मभूमी तिर्थ क्षेत्र’ची परदेशातून निधी स्विकारण्यासाठी नोंदणी केली आहे. परदेशातून मिळालेला निधी एकाच बँकेतील अकाऊंटमध्ये पाठवता येईल. दुसऱ्या बँकेत किंवा दुसऱ्या अकाऊंटवर हे पैसे पाठवता येणार नाहीत.

अधिक वाचा  ‘मोदीजी, तुम्ही आजारपणात माझी चौकशी करता पण…; उद्धव ठाकरेंचं जोरदार भाषण, टाळ्या अन् शिट्ट्या

एनजीओ किंवा ट्रस्ट परदेशातून मिळालेला निधी केवळ संसद मार्ग शाखेच्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या अकाऊंटमध्येच मिळवू शकतात, असा नियम सांगतो. परदेशातून निधी मिळवता यावा यासाठी ट्रस्टने जून महिन्यामध्ये FCRA कडे अर्ज सादर केला होता. त्यानंतर बुधवारी FCRA कडून त्यांना मंजुरी मिळालेली आहे.

२०२० मध्ये श्रीराम जन्मभूमी तिर्थ क्षेत्र ट्रस्टची स्थापना करण्यात आली होती. देशातील भाविक आणि नागरिकांकडून राम मंदिराच्या उभारण्यासाठी निधी मिळवण्याचे काम ट्रस्ट करत होती. पण, अद्याप परदेशात असलेल्या भारतीयांकडून निधी घेण्याची त्यांना परवानगी मिळाली नव्हते. आता तो मार्ग देखील खुला झाला आहे.

अधिक वाचा  फिटनेसप्रेमी पुणेकरांतर्फे ‘पुणे स्पोर्ट्स कॉन्क्लेव्ह’ आंतरराष्ट्रीय खेळाडू घडवण्यास प्राधान्य: मुरलीधर मोहोळ

मोदींच्या हस्ते उद्घाटन

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिलेल्या माहितीनुसार, राम मंदिर १ जानेवारी २०२४ रोजी बनून तयार होईल. पंतप्रधान मोदी यांनी ५ ऑगस्ट २०२० मध्ये या मंदिराची पायाभरणी केली होती. आता पंतप्रधान मोदी यांच्या हस्तेच मंदिराचे उद्घाटन केले जाणार आहे. २१ जानेवारी ते २४ जानेवारीच्या दरम्यान मंदिराचे उद्घाटन करण्यात येईल.

सुप्रीम कोर्टाचा निर्णय

तत्कालीन सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या नेतृत्त्वातील पाच न्यायमूर्तींच्या खंडपीठाने ९ नोव्हेंबर २०१९ रोजी ऐतिहासिक निर्णय दिला होता. अयोध्येमधील बाबरी मशिदवर असलेल्या जागी राम मंदिराच्या उभारणीला कोर्टाकडून परवानगी देण्यात आली होती. मशिदीसाठी इतरत्र जागा देण्यात आली होती.