हैदराबादः काँग्रेसच्या माजी अध्यक्ष सोनिया गांधी यांनी हैदराबादजवळ एका सभेला संबोधित केलं. निवडणुकीच्या अनुषंगाने त्यांनी तेलंगणासाठी सहा मोठ्या घोषणा केल्या आहेत. या महान राज्याच्या विकासाची संधी काँग्रेसला मिळावी, अशी माझी इच्छा असल्याचं सोनिया गांधी म्हणाल्या.

सोनिया गांधी म्हणाल्या की, तेलंगणामध्ये काँग्रेसचं सरकार आणण्यासाठी आपल्याला प्रयत्न करायचे आहेत. काँग्रेसचं सरकार तेलंगणामध्ये आल्यानंतर महिलांना महालक्ष्मी योजनेंतर्गत प्रत्येक महिन्याला अडीच हजार रुपये दिले जातील, महिलांना मोफत बस प्रवास दिला जाईल, असं आश्वासन त्यांनी तिलं.

तसेच शेतकऱ्यांना वर्षाकाठी १५ हजार रुपये आर्थिक मदत मिळेल. तर शेजमजुरांना १२ हजार रुपये मिळतील आणि धान पिकावर ५०० रुपयांचा बोनस मिळेल. यासह गृह ज्योती योजनेची हमी त्यांनी दिली. सर्व घरांना २०० युनिटपर्यंत मोफत वीज मिळेल, असं आश्वासन देण्यात आलं.

अधिक वाचा  …‘’तर तुम्ही नकली शिवसेना चालवत आहात, खरी शिवसेना शिंदेंकडेच आहे” ; शाहांचा ठाकरेंवर हल्लाबोल

सोनिया गांधी पुढे म्हणाल्या की, ज्यांच्याकडे स्वतःचे घर नाही त्यांना ५ लाख रुपये मिळतील आणि तेलंगणा चळवळीतील लढवय्यांना २५० चौरस फुटांचा भूखंड मिळेल. युवा विकास योजनेंतर्गत विद्यार्थ्यंना ५ लाख रुपयांचे विद्या भरोसा कार्ड आणि प्रत्येक विभागात एक तेलंगणा इंटरनॅशनल स्कूल उभा करण्याचा संकल्प त्यांनी जाहीर केला. जाहिरनाम्याबद्दल सोनिया गांधींनी पुढे सांगितलं की, चेयुथा योजनेंतर्गत ४ हजार रुपये मासिक पेन्शन आणि १० लाख रुपयांचा राजीव आरोग्यश्री विमा मिळेल.

विद्यमान मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव आणि त्याच्या कुटुंबाने स्वतःचं शासन स्थापित केलं आहे. त्यांना लोकांचा आवाज ऐकू येत नाहीये. निजामाप्रमाणे ते राज्य करीत असल्याचा घणाघात काँग्रेसने केला. ‘आज तक’ने हे वृत्त दिले आहे.