नऊ हजार कोटींचा अर्थसंकल्प मांडणारी श्रीमंत महापालिका असं बिरूद मिरवणारी पुणे मनपा शाळा सुरू होऊन तीन महिने उलटून देखील अजुन विद्यार्थ्यांना शालेय साहित्य, दप्तरे, गणवेश इत्यादी देऊ शकलेली नाही. आजवर पुणे शहरातील मनपा शाळेतील सुमारे लाखभर विद्यार्थी या शैक्षणिक साहित्यापासून वंचित आहेत. वास्तविकता जून महिन्यातच ही प्रक्रिया सुरू करणे गरजेचे होते परंतु प्रशासनाची उदासीनता आणि ठराविक लोकांच्या आर्थिक हितासाठी मनपा प्रशासन विद्यार्थांच्या भविष्याशी खेळत आहे. अधिकाऱ्यांच्या पंचतारांकित ऑफिसेस साठी, नेत्यांच्या दौऱ्यासाठी , स्वतःच्या किमती गाड्यांच्या हौशेसाठी अशा इतर अनेक वायफळ खर्चासाठी प्रशासनाकडे बजेट आहे पण विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी च पालिकेची कंगाल अवस्था का आहे?

अधिक वाचा  बच्चू कडूंना ठाकरेंनी पैसा पुरवला, रवी राणांचा सर्वात मोठा आरोप, संपत्ती जाहीर करण्याचं आव्हान!

तरी सर्व विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात ही रक्कम पुढील ४८ तासांत जमा करावी अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना, पुणे शहरा च्या वतीने निवेदनाने मा. प्रशासकीय अधिकारी, शिक्षण विभाग यांकडे केली, ४८ तासांत हा विषय निकाली न काढल्यास पुढील आंदोलन हे मनसे पद्धतीने होईल व याची जबाबदारी पालिका प्रशासनाची असेल असा इशारा यावेळी देण्यात आला.

सन्मा. अमित साहेब ठाकरे यांच्या आदेशाने व महा राज्य संघटक- मा. प्रशांत कनोजिया आणि महा. राज्य सचिव आशिष साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या आंदोलनात अभिषेक थिटे ( महा. राज्य कार्यकारिणी सदस्य) , अमोल शिंदे (अध्यक्ष, पुणे) , शहर संघटक – ॲड. अमेय बलकवडे , महेश भोईबर उप शहराध्यक्ष – सचिन ननावरे, परिक्षीत शिरोळे, विक्रांत भिलारे , विभाग अध्यक्ष – आशुतोष माने, संतोष वरे, कुलदीप घोडके, शशांक अमराळे,केतन डोंगरे, अशोक पवार, निलेश जोरी, हेमंत बोळगे , विभाग सचिव – मयुर शेवाळे, सूरज पंडित व विशाल कांबळे , सागर गाडेकर, अथर्व साने, रोहित बिराजदार , अक्षय भोसले, ऋषभ थोरात इत्यादी अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सदर आंदोलनाचे नेतृत्व उपाध्यक्ष – पुणे शहर धनंजय विजय दळवी यांनी केले