सोहराबुद्दीन शेख बनावट चकमक प्रकरणात देशाचे गृहमंत्री अमित शाह यांना आरोपी करण्यात आले होते. या प्रकरणाची सुनावणी करणारे न्यायमूर्ती लोया एका लग्नाला गेले होते. मात्र, त्या लग्न सभारंभात न्यायमूर्ती लोया यांचा हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. पंरतु, न्यायमूर्ती लोया यांचा मृत्यूमागे भाजप नेत्यांचा हात असल्याचा आरोप करत याप्रकरणी एसआयटी चौकशीची मागणी करण्यात आली होती. ही मागणी नागपूरचे वकील सतीश उईके यांनी केली होती. वकील सतीश उईके या प्रकरणामुळे चर्चेत आले होते.

त्यानंतर वकील सतीश उईके यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही मोठा आरोप केला होता. फडणवीस यांनी 2014 च्या निवडणूक प्रतिज्ञापत्रात त्यांच्या गुन्हेगारी प्रकरणांची माहिती लपवल्याचा आरोप त्यांनी केला. याबाबत त्यांनी स्थानिक न्यायालयात फडणवीस यांच्याविरोधात याचिका दाखल केली. तसेच, निवडणूक आयोगाकडे तक्रारही केली होती.

अधिक वाचा  शिंदे सेनेला शरद पवारांचा धक्का, करमाळ्याचे शिवसेनेचे माजी आमदार हाती घेणार तुतारी

भाजपाला आणि फडणवीस यांना अडचणीत आणणाऱ्या वकील सतीश उईके यांच्याविरोधात नागपूर इम्प्रूव्हमेंट ट्रस्टचे (एनआयटी) विभागीय अभियंता पंकज पाटील यांनी तक्रार दाखल केली होती. पाटील यांच्या तक्रारीनंतर त्यांची ईडी चौकशी करण्यात आली. सतीश उईके यांची तब्बल १२ तास चौकशी केल्यानंतर ईडीने त्यांना अटक करण्याचा निर्णय घेतला. अटक केल्यानंतर ईडीने त्यांना तातडीने मुंबईत आणून अटक केली.

मनी लाँड्रिंगच्या आरोपाखाली तुरुंगात
खोटी कागदपत्र तयार करणे आणि त्या माध्यमांतून ब्लॅकमेल करणे हा त्यांचा मुख्य व्यवसाय असल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला. काही प्रकरणात त्यांनी खोटे निकाहनामे आणि इतर खोटी कागदपत्र तयार केल्याचेही उघड झाले. सतीश उईके यांच्यासह सहा जणांनी विठ्ठल ढवळे यांच्या मालकीची सुमारे ११ कोटी किंमतीची जमिन हडपली. या प्रकरणात ईडीने उईके आणि त्याचा भाऊ प्रदीप यांना अटक केली होती. एप्रिल २०२२ पासून हे दोघे भाऊ मुंबईतील आर्थर रोड कारागृहात आहेत.

अधिक वाचा  प्रीतमताईची काळजी करू नका, मी तिला नाशिकमधून उभी करेन; पंकजा मुंडेंचं आश्वासन

MCOCA अंतर्गत कारवाई
जानेवारीमध्ये NET कडून उईके यांच्याविरोधात औपचारिक तक्रार प्राप्त झाली. त्यानुसार अजनी पोलिसांनी सतीश उईके याच्यासह सहा जणांवर फसवणूक आणि बनावटगिरीच्या विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला. आतापर्यंत वकील सतीश उईके, त्याचा भाऊ प्रदीप उईके, पत्नी माधवी, श्रीरंग गृहनिर्माण सहकारी संस्थेचे अध्यक्ष सुभाष मणिलाल बघेल, चंद्रशेखर माटे आणि उईके कुटुंबातील महादेवराव उईके, मनोज महादेवराव उईके यांच्यावर एकूण १३ गुन्हे दाखल केले आहेत. आज नागपूर पोलिसांनी वकील सतीश उईके यांच्यासह अन्य सहा आरोपी यांच्यावर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा, 1999 (MCOCA) अंतर्गत गुन्हा दाखल केला, अशी माहिती नागपूरचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली आहे.