राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जपानकडून शासकीय अतिथी हा बहुमान मिळाला आहे. हा मान यापूर्वी देशाचे विद्यमान पंतप्रधान तथा गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना मिळाला होता. जपान सरकारने देवेंद्र फडणवीस यांना शासकीय अतिथी असा दर्जा देऊन आमंत्रित केलं आहे. फडणवीस येत्या २० ऑगस्टपासून जपानच्या दौऱ्यावर आहेत.

गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना २०१३ साली हा सन्मान मिळाला होता. देवेंद्र फडणवीसांनी मॉरशिसमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अगोदर अनावरण केलं होतं. हा आपल्यासाठी बहुमान असल्याचं त्यांनी नमूद केलेलं. आता जपान सरकारने त्यांचा सन्मान केला आहे. जपानच्या दौऱ्यामध्ये फडणवीस हे परराष्ट्र व्यवहार मंत्री, अर्थमंत्री, पर्यटनमंत्री यांच्याशी चर्चा करतील.

अधिक वाचा  पडळकरांच्या अजितदादांवरील टीकेला मिटकरींचं प्रत्युत्तर “तुमचा पाळीव कुxx लायकीपेक्षा…”,

जपानमध्ये देवेंद्र फडणवीस हे जपान-इंडिया असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठका घेणार आहेत. तसेच विदेशी गुंतवणूकदारांसमवेत चर्चा करणार आहेत. महाराष्ट्राच्या विकासासाठी हा दौरा महत्त्वाचा समाजाला जातोय. विशेष म्हणजे सोनी, एनटीटी, समिटोमो यासारख्या नामवंत कंपन्यांसोबत फडणवीसांच्या बैठका घेतील.

जपान दौऱ्यावर असताना देवेंद्र फडणवीस बुलेट ट्रेन आणि टोकियो मेट्रो प्रकल्पांना भेटी देऊन कार्यपद्धतीचा अभ्यास करणार आहेत. दि. २० ते २५ ऑगस्ट असा फडणवीसांचा दौरा असणार आहे. फडणवीसांना शासकीय अतिथी असा विशेष दर्जा मिळाल्याने त्यांचं कौतुक होतंय.