कोथरूड – बावधन भागातील नागरिकांना जागतिक कोरोना महामारीची चाहुल लागताच अन् परदेशी या रोगाने झालेल्या दाहक आकडेवारीने सर्वांच्या मनात धस्स होत असताना बावधन भागातील लोकांना मात्र दिलीप (आण्णा ) वेडेपाटिल यांनी मात्र मदत ही जबाबदारी समजत कोरोनाला रोखण्यासाठी भक्कम उभे राहत मायेचा आधारवड होत गोर गरीब लोकांना पोटाला घास अन् आरोग्याची काळजी घेण्याचे व्रत घेतले. आज पुणे शहरातील वाढत असलेली रुग्णांची अन कोथरूड बावधन प्रभागात आटोक्यातील रुग्णांची संख्या ही योग्य दक्षेतेचे लक्षण आहे.

प्राथमिक तयारी अन् सज्जता…

पुणे महानगरपालिकेच्या वतीनेच कुठेतरी सर्रास पार्किंगला औषध फवारणी करुन फोटो न काढता आपला प्रभाग निर्जंतुकीकरण करण्याचा संकल्प करत 5 व्यक्तीगत पंप घेवून कोथरुड- बावधन भागातील सर्व सोसाट्यातील सर्व जिने, दरवाजे, टेरेससह एक महिनाभर संपुर्ण भाग स्वछ केले. मंदिरे, शाळा ,पोलीस ठाणे, गोरगरिबांही 5000 मास्क चे वाटप करण्यात आले. यामुळे घरा-घरात कोरोना युद्धाचा सामना करण्यासाठी आवश्यक साधने उपलब्ध झाल्यानंतर दिलिप आण्णा वेडेपाटिल अत्यंत सचोटीने हे युद्ध जिंकण्याचा संकल्प करत प्रभागात परदेश प्रवास केलेल्या 22 लोकांची तपासणी करुन घरातच विलगीकरण केले.

अधिक वाचा  मोदी सरकारला 100 दिवस पूर्ण; तिसऱ्या टर्ममध्ये घेणार मोठा निर्णय? देशभरात लवकरच निवडणुका…

प्रभागातील लोकांची काळजी घेण्यासाठी दिलीप वेडेपाटिल यांनी 7000 लोकांची तपासणी करत कोरोनाला प्रभागात शिरकाव करण्यापासून वाचवले आहे. सामान्य नागरिकांच्या मनातील भिती जावुन त्यांना आपण निरोगी असल्याची खात्री करण्यासाठी घरोघरी जावुन पुणे महापालिकेच्या वतीने तपासणी करण्याचे काम केले.

निकडीच्या काळात हक्काचा आधार

प्रभागातील सर्वांच्या पोटात अन्न गेल्या शिवाय मला जेवण्याचा हक्क नाही याच सामजिक भावनेने प्रत्येक भुकलेल्या लोकांना अन्न आणि शिधा देण्याच्या कामाला सुरुवात केली. महिनाभरापासून सुरु असलेली ही सेवा आजही प्रभातील 800 ते 900 लोकांना दररोज भोजनाची व्यवस्था देत आहे.

अधिक वाचा  आत्राम, मुश्रीफांनंतर तानाजी सावंत भरणेमामांचा ‘करेक्ट कार्यक्रम’; महायुतीच्या ‘दिग्गजां’ची पवारांच्या भेटीस गर्दी

प्रभागात काम करणारे सुरक्षारक्षक,पोलीस, आणि सर्व शासकीय कर्मचारी यांना पिण्याचे पाणी, गहू, निर्जतूकीकरण, मास्क फील्ड शीड, दररोजचे जेवण देण्यात येत आहे.

प्रभागातील हातावर पोट असलेल्या मजुर,रिक्षावाले, कंत्राटी कामगार, घरकाम करणा-या महिला,बचतगट, काच कागद गोळा करणारे, भाजीपालावाले, यांच्या घरातील लोकांना अन्न धान्य मिळण्यासाठी आठ हजार लोकांना शिधावाटप केले. त्याबरोबरच भाजीपाला घेवून जाताना गर्दी टाळण्यासाठी प्रभागातील लोकांना घरपोच भाजीपाला देण्याची सोय करण्यात आली आहे. बावधन – कोथरुड मधील सामान्य नागरिकांप्रमाणेच याभागात मोकाट जनावरांची ही अन्नपाण्याची सोय करण्यात आली आहे.

महसुली त्रुटीवरही यशस्वी मात ……

अधिक वाचा  खेडमध्ये ‘दादां’चा आणखी एक विश्वासू मोहरा थोरल्या साहेबांच्या गळाला; खेड-आळंदी ‘तुतारी’ कुणाच्या हाती?

बावधन पुणे महानगरपालिकेच्या हद्दीत असले तरी या भागातील लोकांची शासकीय तिहेरी अडचण झालेली आहे. बावधन खु।। चा भाग खडकवासला विधानसभा मतदारसंघात तर पुणे महानगरपालिकेच्या प्रभागाची रचनेत कोथरुडमध्ये व्यवस्था तर तहसील व महसुली दप्तरी मुळशी तालुका असल्याने या भागातील लोकांची कायमच प्रशासकीय ससेहोलपट होतं होती.

या अत्यंत जिकरिच्या काळात बावधन भागातील नागरिकांना हक्काचे शासकीय अन्नधान्य मिळवण्याचा मार्ग दिलिप आण्णा वेडेपाटिल मुळशी तहसील यांच्याकडे पाठ – पुरावा करत अन्नधान्य वितरण व्यवस्था देण्याची सोय केली. अत्यंत हालकीच्या परिस्थितीत शासकीय यंत्रणेमार्फत 2 हजार लोकांना प्रथमच बावधन गावात अन्नधान्य देण्यात आल्याने अनेकांना हक्काचा आधारही दिलीप आण्णा यांच्या वतीनेच मिळाला.