कोकणातील रस्त्यांच्या दुरुस्तीच्या मुद्यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेना आंदोलन करणार आहे. यापार्श्वभूमीवर राज ठाकरे पनवेलमध्ये आले आहेत. आंदोलनाला हिरवा झेंडा दाखवण्यासाठी ते येथे आले आहेत. यावेळी त्यांनी रस्त्यांच्या दुरुस्तीवरुन सत्ताधारी पक्षावर टीका केली. सध्या महाराष्ट्रात निर्लज्जपणाचा कळस सुरु आहे, असं ते म्हणाले.

समृद्धी महामार्गाला फेन्सिंग घातलेली नाही. रस्त्यावर जनावरे येत असतात, तेव्हा त्याला काय करावं. चारशे दिवस झाले रस्ता लोकांसाठी खुला करुन दिला आहे. आतापर्यंत साडेतीनशे लोक मृत्यूमुखी पडलेत. तेथे काम केलं नाही, पण टोलनाका उभा केला आहे. म्हणजे इथे टोल भरा आणि मरा, अशी परिस्थिती असल्याचं राज म्हणाले.

कोकणातील रस्त्यांची भीषण अवस्था झाली आहे. सत्ताधारी पक्ष काय करतोय माहिती नाही. गेल्या अनेक वर्षांपासून अशीच परिस्थिती आहे. भाजपने जरा या रस्त्यांकडे लक्ष द्यावे. आमदार फोडण्यापेक्षा पक्ष निर्माणावर भर द्यावा. तुरुंग कसा असतो हे छगण भुजबळ यांनी अजित पवारांना सांगितलं असेल म्हणून ते भाजपसोबत गेले असा टोला त्यांनी यावेळी लगावला.

अधिक वाचा  डॉ. प्रदीप कुरुलकरबाबतचा ‘तो’ अर्ज फेटाळला; हे आरोपी अधिकारांच्या विरुद्ध ATSला धक्का

मुख्यमंत्री म्हणतात महामार्ग पूर्ण होईल. पण मृत्यूमुखी पडलेल्यां लोकांचं काय. अडीच हजार लोक आतापर्यंत मृत्यूमुखी पडले आहेत. चांद्रयान कशाला पाठवलं. खड्डेच पाहायचं होतं तर इथेच सोडायचं होतं. मुंबई-गोवा महामार्गावर आतापर्यंत १५ हजार ५६६ कोटी रुपये खर्च झाले… पण रस्ता झाला नाही. रस्त्याचे काम होत नसताना परत परत त्याच पक्षांना का निवडून दिलं जातं. मला महाराष्ट्राच्या जनतेचं कळत नाही, असं राज म्हणाले.

कोकणातील जमिनी इतरांच्या हातात जात आहेत. नाणार प्रकल्प रद्द होणार म्हटल्या म्हटल्या बारसु प्रकल्प आला. पाच हजार एकर जमीन कोण विकत घेतली, कोण तिथे काम करतंय. आमचा कोकणी भोळसट बांधव चिरीमिरी पैसे घेऊन जमीन विकतात. आपलीच लोकं जमिनी दुसऱ्यांच्या घशात घालत आहेत, असं ते म्हणाले.

अधिक वाचा  पडळकरांच्या अजितदादांवरील टीकेला मिटकरींचं प्रत्युत्तर “तुमचा पाळीव कुxx लायकीपेक्षा…”,

अपघातात जे लोक मृत्यूमुखी पडलेत त्यांचं काय. या लोकांना विश्वास आहे की आम्ही कसंही काम केलं तरी ते आम्हालाच मतदान करतील. निवडणुकीच्या पुढे काही मुद्दासमोर आणणार आणि मतदान घेऊन जातील. हा त्यांचा धंदा आहे. रस्ते टिकले तर यांना पैसे कसे मिळणार. नवीन रस्ते म्हणजे नविन कमिशन मिळणार, अशी टीका राज यांनी केली.

जे खोके म्हणून ओरडतात त्यांच्यातडे कंटेनर आहेत. बाळासाहेबांचे नाव पुढे करुन मतदान मागतात. आम्ही भावनिक होतो. मुंबई बरबाद व्हायला काळ गेला, पुणे बरबाद व्हायला वेळ लागणार नाही. आज पुण्यात पाच-पाच पुणे झालेत. काहीच प्लॅनिग नाही. तेथे गुदमरणारा मराठी माणूस आहे. तिथे कोण येतंय कोण जातंय काही माहिती नाही.

अधिक वाचा  विसर्जन हौद कर्तव्य बजावताना कंत्राटी कामगार ३०% टक्के भाजला; प्रशासनाने हात झटले

२०२३ मध्ये गोव्यात कायदा केलाय. गोव्यातील शेतजमीन सहज कोणालाही मिळणार नाहीत. जमीन घेतली तर शेतीच करावी लागेल. दुसरा धंदा करता येणार नाही. भाजप मुख्यमंत्र्याचा हा कायदा आहे. उत्तर भारतीयांना या जमिनी दिल्या जाणार नाहीत असा कायदा त्यांनी केला. हे समजून घ्या. राज ठाकरे यावर काही बोलला तर तो देशद्रोही असं म्हणतील.

जम्मू-काश्मिरमध्ये ३७० कलम काढले. तेथे आता जमिनी घेता येतील. पण, अदानी-अंबानी यांना तेथे जमिनी घेता आले नाहीत, तर आपल्याला काय जमिनी घेता येणार. हिमाचलमध्ये जमीन घेऊन दाखवा, ईशान्य भारतात जमीन घेऊन दाखवा, तुम्ही जमीन घेऊ शकत नाही. कारण काही राज्यांना वेगळे कायदे आहेत. हे महाराष्ट भोगतोय. महाराष्ट्राच्या सर्व शहरांची वाट लागतेय, असं ते म्हणाले.