काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांना लोकसभेतून निलंबित करण्यात आले आहे. विशेषाधिकार समिती त्यांच्या विरोधात अहवाल सादर करेपर्यंत अधीर रंजन यांना लोकसभेतून निलंबित करण्यात आले आहे. हे प्रकरण विशेषाधिकार समितीकडे प्रलंबित आहे. याप्रकरणी समिती चौकशी अहवाल सादर करणार आहे. तोपर्यंत अधीर रंजन यांना सदनातून निलंबित करण्यात येणार आहे.

भाजप नेते प्रल्हाद जोशी यांनी अधीर रंजन चौधरी यांच्या निलंबनाचा प्रस्ताव मांडला, तो संसदेत मान्य करण्यात आला. प्रल्हाद जोशी यांनी अधीर रंजन चौधरी यांच्यावर संसदीय कामकाजात सतत व्यत्यय आणण्याचा आणि देशाची व प्रतिमेची बदनामी केल्याचा आरोप केला.

अधिक वाचा  नवनीत राणा चिप मेंटॅलिटीची बाई, भाजपने भुंकण्यासाठी सोडलंय; इम्तियाज जलिल यांचा राणांवर हल्लाबोल

दरम्यान अधीर रंजन चौधरी यांच्या बचावासाठी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार मल्लिकार्जुन खर्गे यांनी राज्यसभेत उत्तर दिले आहे. नीरव म्हणजे शांतता, असे खर्गे म्हणाले.

नीरव म्हणजे शांत आणि मोदी शांत असतात म्हणून त्यांना नीरव मोदी असे संबोधलं. मोदी यांना शांत म्हटल्यामुळे अधीर रंजन चौधरी यांचे निलंबन का करण्यात आले, अस प्रश्न मल्लिकार्जुन खर्गे यांनी सभापतींना विचारला.

लोकसभेतून निलंबित झाल्यानंतर अधीर रंजन यांनीही तीच टीका केली ज्यामुळे त्यांना निलंबित करण्यात आले होते. ते म्हणाले होते की, माझा उद्देश पंतप्रधानांचा अनादर करण्याचा नव्हता. मी धृतराष्ट्र-द्रौपदीचे उदाहरण दिले होते.

अधिक वाचा  डॉ. नरेंद्र दाभोलकर निकाल : 11 वर्षांचा प्रतीक्षा, 17 मिनिटात निकाल, कोर्टात काय काय घडलं?

भाजपचा एक उंच खासदार माझ्यावर हल्ला करण्यासाठी आला होता. मी कोणतीही तक्रार केली नाही. ते राजकारण करत आहेत. मी कोणताही चुकीचा शब्द बोललो नाही. एखाद्या घटना तज्ज्ञाला विचारा, अधीर रंजन चौधरी म्हणाले.