पुणे महापालिकेतर्फे गुठेवारीमध्ये बांधकामे नियमित करावयाचा प्रस्ताव दाखल करण्याची मुदत ३१ जुलै २०२३ रोजी संपली असून पुणे शहरातील नागरिकांचा विचार करून या योजनेला मुदतवाढ देण्याची मागणी पृथ्वीराज सुतार माजी शिवसेना गटनेते-पुणे मनपा यांनी पुणे महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांच्याकडे केली आहे.

पुणे शहरामध्ये सामान्य नागरिकानी छोटया-छोटया पाव गुंठा, अर्धा गुठा, एक गुंठा,दोन गुठे अशा जागावर छोटी-छोटी बांधकामे गुंठेवारी पध्दतीने केली आहेत, ही बांधकामे हजारोंच्या संख्येने आहेत, गुठेवारीमध्ये बांधकामे नियमित करावयाचा प्रस्ताव दाखल करण्याची मुदत ३१ जुलै २०२३ रोजी संपली आहे. अनेक नागरिकांना त्यांची बांधकामे गुंठेवारी पध्दतीमध्ये नियमित करावयाची आहेत, त्यासाठी मुदत वाढवून मिळावी म्हणून नागरिक आमच्याकडे सातत्याने मागणी करत आहेत. ह्या सामान्य नागरिकाची घरे नियमित करून महानगरपालिके ला मोठ्या प्रमाणात महसूल मिळणार आहे. तरी गुंठेवारीसाठी नविन प्रस्ताव दाखल करण्यासाठी मुदतवाढ देण्यात यावी ही लेखी विनंती करण्यात आली आहे.

अधिक वाचा  धक्कादायक! नव्याने पदवीधर झालेल्या तरूणांच्या नोकऱ्या धोक्यात; काय आहे कारण?