Dhananjay Munde Agriculture Minister

राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी मुंबई TAK च्या चावडीवर हजेरी लावली होती. या चावडीवर धनंजय मुंडे यांनी अनेक प्रश्नावर दिलखुलास उत्तर दिली आहेत. अजित पवार यांच्या राष्ट्रवादीतील बंडावर देखील धनंजय मुंडे यांनी भाष्य केले. अजित पवार यांच्या बंडा दरम्यान नेमक्या काय काय घडामोडी घडल्या आहेत, या घडामोडी देखील धनंजय मुंडे यांनी स्पष्टपणे सांगितल्या आहेत.

अजित पवार यांच्या बंडानंतरच्या घडामोडीवर बोलताना धनंजय मुंडे म्हणाले, पवार साहेब आमचे दैवत आहेत, आमचे आधार आहेत, पवार साहेबांना सोडण्याच्या आणि न सोडायचा या प्रक्रियेमध्ये मी सामान्य कार्यकर्ता होता. तसेच ज्या माणसाला कधीच कोणाला ओळखता आले नाही, त्या माणसाला मी ओळखण हा तुमचा गैरसमज आहे, असे धनंजय मुंडे म्हणाले आहेत.भाजप सोबत जाणे ही राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष म्हणून घेतलेली भूमिका आहे. त्यामुळे राष्ट्रवादी कॉग्रेस म्हणून आम्ही जेव्हा ही भूमिका घेतो, या संदर्भात ५ तारखेच्या राष्ट्रवादी कॉग्रेसच्या त्या मेळाव्यात अजित दादांनी आपली भूमिका स्पष्टपणे सांगितली आहे. साल निहाय सांगितली, तारीख निहाय सांगितली. त्यामुळे मी आणखीण बोलणे उचित नाही, असे देखील धनंजय मुंडे यावेळी म्हणाले आहेत.

अधिक वाचा  राजकारण्यांच्या पाठिंब्यामुळे गुजराती माणसांचा आत्मविश्वास वाढलाय: रोहित पवार

ईडी, सीबीआयच्या दबावाखाली राष्ट्रवादी भाजपसोबत गेल्याचा आरोपावर धनंजय मुंडे म्हणाले, ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्सच्या नोटीस या आज नाही बऱ्याच वर्षापासून चालल्या आहेत,त्यामुळे या चार गोष्टीमुळे जवळ गेलो असे नाही आहे, असे देखील धनंजय मुंडे यांनी स्पष्ट केले.सर्व माननीय नेते त्या ठिकाणी होते, आणि त्यांनी हा निर्णय घेतला होता, त्यामुळे माझ्या सारखा दुसऱा तिसरा फळीतला कार्यकर्ता, तो काय वेगळा विचार करत नव्हता, आम्ही सर्वांनीच तिकडे सांगितले,आम्ही राष्ट्रवादी कॉग्रेंस पक्षाची विचारधारा सोडली नाही. आमचं दैवत पवार साहेबचं आहेत,आमचे आधार स्तंभ पवार साहेबच आहेत, पण पक्ष म्हणून घेतलेली भूमिका हा महायुतीचा भाग होता, सर्व आमदारांची कामे होणे, मतदार संघात विकास होणे, आमदार म्हणून उत्तरदायित्व आहेच ना, असे देखील धनंजय मुंडे यांनी सांगितले आहे. देव देवाऱ्यात आहे आणि मनात आहे, आता देवाऱ्यात जाऊन देवाने पुजा करू नये असे जरी म्हटले तरी भक्त त्याला मनात ठेऊन त्याला पुजतो,असेही मुंडे म्हणाले आहेत.

अधिक वाचा  जुन्या वाड्यांच्या पुनर्विकासाचा प्रश्न मार्गी लावणार: मुरलीधर मोहोळ

पंकजा मुंडेच्या राजकीय कारकीर्दीवर काय म्हणाले?

भाजप नेत्या पंकजा मुंडे यांची राजकीय कारकिर्द संपवण्याचा प्रयत्न भाजपच्याच काही बड्या नेत्यांमार्फत सुरु असल्याच्या प्रश्नावर धनंजय मुंडे म्हणाले, आपण लोकांना काय दाखवायचा प्रयत्न करतोय,आपण संपलोय,आपल्याला कुणीतरी संपवण्याचा प्रयत्न करतोय, की आपण हे दाखवायचा प्रयत्न करायचा, कितीही वाईट प्रसंग आला तरीही मी सामान्य कार्यकर्ता आहे, मला कुणी संपवू शकत नाही. जर या दोन गोष्टी कळाल्या की व्यक्ती यशस्वी होतो, असा कानमंत्र आणि सल्लाच धनंजय मुंडे यांनी पंकजा ताई यांना दिला.

तसेच मला कुठेच वाटतं नाही की त्यांच्या राजकीय करिअरला कुठेच ग्रहण लागेल आहे किंवा कुणी लावायचा प्रयत्न करतंय.तसेच काही होईल असे मला तरी वाटतं नाही, असे देखील धनंजय मुंडे म्हणाले. प्रत्येकांच्या राजकीय जीवनामध्ये एक संघर्षाचा काळ असतो, त्यातून त्याला जावचं लागतं. 2009 ला माझ्या जागी पंकजा ताई आल्या आम्ही स्विकारलं त्याच्यानंतर माझ्या जीवनात प्रसंग आला. मला असे विलन केले होते की लोक माझ्या तोंडावर थुकलेले. माझ्या गाड्या फोडलेल्या, दगड फेकलेले, या सगळ्या प्रसंगातून मी गेलो त्यावेळेस मी काही संपलो होतो का? इतके वाईट प्रसंग तर आले नाही, तर कुणी साईडलाईन करतयं काय, याच्यावरून कुणाचं राजकीय अस्तित्व संपवायचा प्रयत्न होतोय, असे मला अजिबात वाटत नाही, असे धनंजय मुंडे यांनी स्पष्ट केले.