बारामती – येथील सह्याद्री अँग्रो व डेअरी प्रा. लि. कंपनीच्या तब्बल 9 कोटी 96 लाख रुपयांच्या नुकसानीस कारणीभूत ठरल्याप्रकरणी कंपनीचा मुख्य व्यवस्थापकीय संचालक आशिष दुबे (रा. बाणेर, पुणे) याच्याविरुध्द पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या संदर्भात संतोष पोपटराव सावंत यांनी फिर्याद दिली आहे. सन 2016 ते 2021 या पाच वर्षांच्या कालावधीत आशिष दुबे याने कंपनीची विविध प्रकारे फसवणूक केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

फिर्यादीत नमूद केले आहे की, सहयाद्री अॅग्रो व डेअरी कंपनीचे संचालक मंडळाने मुख्य व्यवस्थापकीय संचालक पदावर नेमणुक केली असतांना त्याने स्वतःच्या आर्थिक फायदयासाठी पदाचा गैरवापर केला. कंपनी तोट्यात असल्याचे माहीत असतांना देखील लाभांश मिळविण्यासाठी ती नफ्यामध्ये दाखवून कंपनीचे एक कोटी चाळीस लाखांचे कर स्वरूपात, स्वताःला 52,54,200 रूपयांचा लाभांश प्राप्त करून घेतला. देय नसलेला 37 लाख 49 हजारांचा बोनस प्राप्त करून, रजेच्या दिवशी कामावर न येता आल्याचे दाखवून 22 लाख 54 हजार रुपये प्राप्त करून, इतर वाहनांपेक्षा चढया दराने नातेवाईकांची वाहने कंपनीमध्ये लावून 4 लाख 68 हजार रूपयांच्या नुकसानीस, नोकरीवरून काढले असतांना देखील कंपनीचे भाडेतत्वावरील वाहन जमा न करता 2 लाख 71 हजारांच्या कंपनीच्या नुकसानीस, नियुक्तीपत्रामध्ये एकच ड्रायव्हर मंजूर असतांना दोन ड्रायव्हरचा वापर करून 13 लाख 89 हजारांच्या रूपयांच्या नुकसानीत आणले.

अधिक वाचा  भाऊ पार्थच्या पराभवाचा बदला मी घेणार, रोहित पवारांनी मावळमध्ये श्रीरंग बारणेंच्या पराभवाचा विडा उचलला

चढया दराने बिले दिल्याने गंगाजळीत टाकावी लागलेल्या पावणे तीन कोटी रूपयांच्या नुकसानीस व एका कंपनीसोबत सोबत जोपासलेल्या आर्थिक हितसंबंधामुळे कंपनीस बॅंक व्याजापोटी भराव्या लागलेल्या 4 कोटी 73 लाखांच्या नुकसानीस असे एकुण 9 कोटी रुपयांच्या 62 लाखांच्या नुकसानीस कारणीभूत झाल्याने गुन्हा दाखल केला आहे.