राज्य मंत्रिमंडळाची महत्वाची बैठक आज पार पडली. या बैठकीत राज्यातील विविध विभागातील वेगवेगळ्या विषयासंदर्भात काही महत्वाचे निर्णय घेण्यात आले. यामध्ये शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2 राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

या निर्णयाबरोबरच पुणे जिल्ह्यातील दौंड येथे दिवाणी न्यायालय (वरिष्ठ स्तर) हे न्यायालय स्थापन करणे व पदे निर्माण करण्यास मान्यता देण्यात आली आहे. शिंदे-फडणवीस सरकारने दौंडमध्ये दिवाणी न्यायालय (वरिष्ठ स्तर) स्थापन करण्याच्या निर्णयाला मंजूरी दिल्यामुळे अनेक दिवसांपासूनचा हा प्रश्न आता मार्गी लागणार आहे. दौंडमध्ये दिवाणी न्यायालय (वरिष्ठ स्तर) स्थापन करण्याचा प्रश्न शिंदे-फडणवीस सरकारने मार्गी लावत दौंड मतदारसंघाचे आमदार राहुल कुल यांना मोठं गिफ्ट दिलं आहे.

अधिक वाचा  वाहतुकीची कोंडी सोडविण्यास चांदणी चौक प्रकल्प ठरेल पथदर्शी: मुरलीधर मोहोळ

महाराष्ट्रात शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत आल्यानंतर राहुल कुल हे नाव चांगलच चर्चेत आलं. काही दिवसांपूर्वी विधानसभेच्या हक्कभंग समितीची स्थापना करण्यात आली. या समितीच्या प्रमुखपदी आमदार राहुल कुल यांची नियुक्ती करत त्यांना शिंदे-फडणवीस सरकारने मोठं गिफ्ट दिलं होतं. त्यानंतर आता पुन्हा एकदा दौंडमधील दिवाणी न्यायालय (वरिष्ठ स्तर) स्थापन करण्याचा प्रश्न मार्गी लावत शिंदे-फडणवीस सरकारने आमदार राहुल कुल यांना मोठं गिफ्ट दिलं आहे.