ओमानच्या विमानाचं नागपूरमध्ये इमर्जन्सी लँडिंग करण्यात आलं आहे. ओमानच्या सलाम एअरलाईन्सच्या विमानाचं नागपूर विमानतळावर इमर्जन्सी लँडिंग करण्यात आलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हे विमान बांगलादेशातील चातगावहून मस्कतला जात होते. यावेळी नागपूर विमानतळावर याचं इमर्जन्सी लँडिंग करण्यात आलं असून विमानातील सर्व प्रवासी सुखरुप आहेत.

नागपुरात विमानाचे इमर्जन्सी लँडिंग

मिळालेल्या माहितीनुसार, ओमानच्या सलाम एअरलाईन्सच्या विमानाने बांगलादेशच्या चाट्टोग्राम येथून मस्कत ला जाण्यासाठी उड्डाण केलंय मात्र या विमानात तांत्रिक बिघाड झाल्याने हे विमान नागपूर विमानतळावर उतरवण्यात आलं. विमानाच्या इंजिनमधून अचानक धूर निघू लागल्याने नागपूर विमानतळावर या विमानाचं इमर्जन्सी लँडिंग करण्यात आलं आहे. विमानातील सर्व प्रवासी सुखरुप आहेत.

अधिक वाचा  खडसेंचा भाजप प्रवेशापूर्वी मोठी घोषणा; समझोता…. संन्यास अन् भूमिकाही केली स्पष्ट; राजकीय चर्चांना उधाण

एअरलाईन कर्मचाऱ्यांसह सर्व प्रवासी सुखरुप

विमानतळ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सलाम एअरलाईनच्या विमानाचं बुधवारी (1 मार्च) रात्री नागपूर विमानतळावर इमर्जन्सी लँडिंग करण्यात आलं. वैमानिकाला विमानाच्या इंजिनमधून अचानक धूर निघत असल्याचं आढळून आलं. या विमानात सुमारे 200 प्रवासी आणि सात क्रू मेंबर्स होते. सर्व एअरलाइन कर्मचाऱ्यांसह सर्व प्रवासी सुखरुप आहेत.-