कसबा आणि चिंचवड विधानसभा पोट निवडणुकीसाठी आज मतदान पार पडत आहे. आज सकाळपासून मतदानाला सुरुवात झाली. मात्र, कसबा आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठीचे मतदान अत्यंत संथगतीने सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. दुपारी एक वाजेपर्यंत चिंचवडमध्ये 20.68 टक्के तर कसब्यात केवळ 18.5 टक्के मतदान झालं आहे. त्यामुळे कसबा आणि चिंचवड या दोन्हीही मतदारसंघामध्ये मतदान अत्यंत संथगतीने सुरू असल्याचे दिसून येत आहे.गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिलेल्या कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीसाठी मतदान आज पार पडत आहे. मात्र, मतदारांमध्ये निरुत्साह दिसून येत आहे. दुपारी 1 वाजेपर्यंत चिंचवडमध्ये फक्त 20.68 टक्के तर कसब्यात केवळ 18.5 टक्के मतदान झाल्याने आश्चर्च व्यक्त करण्यात येत आहे.

अधिक वाचा  गेल्या आठ वर्षांपासून रखडल्या 125 उपजिल्हाधिकाऱ्यांना पदोन्नती; लवरकच 80 अतिरिक्त जिल्हाधिकारी पदे तयार करणार: शासन निर्णय

दरम्यान, महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी मतदानात पैशाचा आणि पोलीस यंत्रणांचा वापर भाजपकडून होत असल्याचा आरोप केला. तर भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांनी सकाळी दगडूशेठ गणपतीची आरती करून मतदान केले. तर दुसरीकडे चिंचवड पोटनिवडणुकीला गालबोट लागले. दोन गटात धक्काबुक्की झाली. अपक्ष उमेदवार कलाटे आणि जगताप यांच्या समर्थकांमध्ये हा वाद झाला. मात्र, पोलिसांनी मध्यस्थी केल्यामुळे वाद मिटला आहे. त्यानंतर येथे पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला असून तणावपूर्ण शांतता आहे. दरम्यान, या दोन्ही पोटनिवडणुकांसाठी भाजप आणि महाविकास आघाडीकडून संपूर्ण ताकदीने प्रचार करण्यात आला. दोन्ही बाजूंचे प्रमुख नेते या पोटनिवडणुकांसाठी पुण्यात ठाण मांडून होते. त्यामुळे कसबा आणि चिंचवड या दोन्ही पोटनिवडणुका चुरशीची होण्याची शक्यता आहे.

अधिक वाचा  ‘वाल्मिक अण्णांना…’, 6 वेळा ‘आवादा’कडे मागितली 2 कोटींची खंडणी