वर्धा येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी साहित्य नगरीत दिनांक ३ ते ५ फेब्रुवारी २०२३ दरम्यान आयोजित ९६ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या प्रा. देवीदास सोटे कविकट्टा काव्यमंचावर वारजे येथील कामगारभूषण कवी राजेंद्र वाघ यांच्या “माय मराठी” या कवितेची निवड करण्यात आली होती. या सभामंडपात माय मराठी कविता सादर करून राजेंद्र वाघ यांनी सभागृहात प्रचंड टाळ्या मिळवून रसिकांची दाद मिळवली. याप्रसंगी सुप्रसिद्ध कवी मा. गुणवंत पाटील, जितेंद्र लाड, डॉ. गिरीश वैद्य बाळासाहेब गीरी, सीताराम नरके, यांच्या उपस्थितीत वर्धा जिल्हाधिकारी मा .राहुल कर्डीले, कविकट्टा समितीचे प्रमुख मा. राजन लाखे आणि प्रसाद देशपांडे, यांचे हस्ते स्मृतीचिन्ह आणि सन्मानपत्र देऊन राजेंद्र वाघ यांना सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वर्षा थोटे यांनी केले तर आभार प्रदर्शन मधुरा इंदापवार यांनी केले.

अधिक वाचा  सेम टू सेम एटीएम कॅशची गाडी मध्यरात्री कोट्यवधींची रोकड पकडली; निवडणूक काळात ४३१.३४ कोटी जप्त

या संमेलनाचे स्वागताध्यक्षपद मा.दत्ता मेघे यांनी तर संमेलनाचे अध्यक्षपदी न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर उपस्थित होते. . याप्रसंगी मावळते अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक मा. भारत सासणे, अखिल भारतीय मराठी महामंडळ अध्यक्षा उषा तांबे, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, शिक्षणमंत्री दीपक केसरकर, कार्याध्यक्ष प्रदीप दाते आणि इतर मान्यवर आचार्य विनोबा भावे सभामंडपातील व्यासपीठावर उपस्थित होते.

राजेंद्र वाघ हे कामगारभूषण पुरस्कार विजेते असून नोकरी करून साहित्य क्षेत्रात कार्यरत आहेत. अनेक राज्यस्तरीय साहित्य संमेलनाच्या आयोजनात त्यांचे योगदान असते.कामगार साहित्यिकांना व्यासपीठ मिळावे म्हणून महाराष्ट्र कामगार साहित्य परिषदेच्या कार्याध्यक्षपदी, तर साहित्यिक कलावंत प्रतिष्ठानचे उपाध्यक्षपदी आणि नारायण सुर्वे साहित्य कला अकादमीच्या कोषाध्यक्षपदी कार्यरत आहेत.