धनुष्यबाण चिन्ह कुणाचं याचा फैसला आजही झाला नसून निवडणूक आयोगाची आजची सुनावणी संपली आहे. यासंबंधी आता पुढील सुनावणी ही 20 जानेवारीला होणार आहे. निवडणूक आयोगामध्ये जमा केलेल्या कागदपत्रांची छाननी करण्यात यावी, ओळखपरेड करण्यात यावी अशी मागणी उद्धव ठाकरे गटाकडून करण्यात आली. तर कागदपत्रांमध्ये कोणतीही त्रुटी नाही असं सांगत शिंदे गटाने सादिक अली खटल्याचा संदर्भ देत धनुष्यबाण आपल्यालाच मिळावा अशी मागणी केली.

शिवसेनेची फूट ही निव्वळ कल्पना, कपिल सिब्बल यांचा दावा

शिवसेनेतील फूट म्हणजे निव्वळ कल्पना असल्याचा युक्तीवाद ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी केला. त्यामुळे शिवसेनेतील फूट ग्राह्य धरू नये असं सांगत ठाकरेंच्या नेतृत्वाखाली असलेली शिवसेना हीच खरी शिवसेना असल्याचा दावा कपिल सिब्बल यांनी केला. शिंदे गटाच्या याचिकेत अनेत त्रुटी असून शिंदे गटाच्या बाहेर जाण्यामुळे पक्षाच्या स्थितीवर कोणताही परिणाम झाला नसल्याचा दावा कपिल सिब्बल यांनी केला. तसेच शिंदे गटाचे आमदार आणि खासदार, ज्यांची संख्या त्या गटाकडून सांगितली जाते, ते सर्वजण उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली निवडून आले आहेत, लोकांनी पक्षाच्या धोरणांना समोर ठेऊन मतदान केलं. त्यामुळे आमदार आणि खासदाराची संख्या ध्यानात घेऊ नये अशी विनंती कपिल सिब्बल यांनी निवडणूक आयोगाकडे केली.

कागदपत्रामध्ये कोणत्याही त्रुटी नाहीत, शिंदे गटाचा दावा

निवडणूक आयोगासमोर सुरू असलेल्या या सुनावणीसाठी ठाकरे गटाकडून 23 लाख कागदपत्रे तर शिंदे गटाकडून चार लाख कागदपत्रे जमा करण्यात आले आहेत. त्यावर ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी शिंदे गटाच्या कागदपत्रांमध्ये काही त्रुटी आहेत असा दावा केला होता. तो खोडून काढताना शिंदे गटाचे वकील महेश जेठमलानी यांनी त्यामध्ये कोणत्याही त्रुटी नसल्याचा दावा केला. तसेच या आधीच्या काही सुनावणींचा दाखला शिंदे गटाच्या वतीने देण्यात आला.

शिंदे गटाकडून सादिक अली खटल्याचा दाखला

1968 साली काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर पक्षाच्या चिन्हाचा विषय हा सर्वोच्च न्यायालयात गेला होता. त्यावेळी निवडणूक आयोग हाच पक्षाच्या फुटीसंबंधी निर्णय देईल असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला होता. या सादिक अली खटल्याचा दाखला शिंदे गटाकडून करण्यात आला.

अधिक वाचा  शिरुरमध्ये मतदानाला थंडा प्रतिसाद; पुण्यातील कसबा मतदारसंघात सर्वाधिक मतदान; राजकीय ड्रामेही सुरूच!

निकाल देण्याची घाई करू नये, ठाकरे गटाची मागणी

महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाबाबत सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाने पक्ष आणि पक्षचिन्हासंबंधी निर्णय देण्यासाठी घाई करू नये, सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणीपर्यंत थांबावं अशी मागणी ठाकरे गटाकडून करण्यात आली. गेल्या वेळी निवडणूक होती म्हणून निर्णय दिला ते ठिक, पण आता तशी कोणतीही आणीबाणीची परिस्थिती नाही असंही ठाकरे गटाच्या वतीनं स्पष्ट करण्यात आलं.

ठाकरे गटाकडून ओळखपरेडची मागणी
आपल्याकडून 23 लाख कागदपत्रांची पूर्तता करण्यात आली असून त्यामधील कोणत्याही व्यक्तीला निवडणूक आयोगाने बोलवावं आणि त्याची ओळखपरेड, छाननी करावी अशी मागणी ठाकरे गटाकडून करण्यात आली. तसेच शिंदे गटाच्या कागदपत्रांचीही छाननी करण्यात यावी अशीही मागणी करण्यात आली.

-:घटनाक्रम:-
कपिल सिब्बल यांनी अजून दोन-अडीच तासांची वेळ मागितली आहे : राहुल शेवाळे

कपिल सिब्बल यांनी अजून दोन-अडीच तासांची वेळ मागितली आहे, युक्तिवादासाठी वेळ लागेल, असं सांगितलं. त्यामुळे सुनावणी पुढे ढकलली, अशी प्रतिक्रिया राहुल शेवाळे यांनी दिली.

कपिल सिब्बल काय म्हणाले?

होणार काय? कायद्यात फक्त युक्तिवाद होतो. महेश जेठमलानी मोठे वकील आहेत ते काहीही करु शकतात. त्यांना विचारा धनुष्यबाणाची सुनावणी आता 20 जानेवारीला
सुनावणी पाच दिवस पुढे ढकलली, पुढची सुनावणी 20 जानेवारीला होणार.

कपिल सिब्बल यांचा पुन्हा युक्तिवाद सुरु

ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांचा पुन्हा युक्तिवाद सुरु. पक्षाच्या घटनेला आवाहन देता येत नाही, कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद.

कपिल सिब्बल यांचा जोरदार युक्तिवाद :

निवडून आलेले आमदार हे पक्षाच्या चिन्हावर निवडून आलेत.त्यामुळे लोकप्रतिनिधी आणि पक्ष वेगवेगळा. कागदपत्रे खरी ठरी असतील तर ओळख परेड करा. तातडीने निर्णय देऊ नका, कोर्टाच्या निकालाची प्रतिक्षा करा.

अधिक वाचा  युक्रेनचं युद्ध थांबवलं, मग अजून मणिपूर का धुमसतय? उद्धव ठाकरेंचा मोदींना रोखठोक सवाल

पक्षात होता तेव्हा पक्षाच्या घटनेवर आक्षेप का घेतला नाही?

पक्षाचा लाभ घेतला आणि परत लोकशाही नाही म्हणता

आतापर्यंतच्या निवडणूक प्रक्रियेवर निवडणूक आयोगाने आक्षेप घेतला नाही. म्हणजे आमची पक्षाची घटना कायदेशीर आहे आमदार आणि खासदार हे पक्षाच्या नुसार निवडून येतात. पक्षाच्या धोरणांना मानून मतदार मतदान करतात

पक्षाची घटना ही योग्यच आहे. तिला आव्हान देता येऊ शकत नाही

आतापर्यंत उमेदवारांना एबी फॉर्म देण्यात येत होते, मग आताच आक्षेप का?

पक्षांतर्गत निवडणुकीसाठी मुदतवाढ द्या.

ठाकरे गटाचा युक्तीवाद चुकीचा

शिंदे गटाच्या कागदपत्रांमध्ये त्रुटी नाहीत. ठाकरे गटाचा युक्तीवाद चुकीचा आहे, जेठमलानी यांचा युक्तिवाद

आदिक अली प्रकरणाचा शिंदे गटाकडून दाखला

आधीच्या निकालांच्या शिंदे गटाच्या वकिलांकडून दाखला दिला जातोय. बहुमत चिन्हासाठी बहुमत आवश्यक, शिंदे गटाकडे बहुमत आहे, जेठमलानी यांचा युक्तिवाद

शिंदे गटाचे वकील महेश जेठमलानी यांचा युक्तीवाद सुरु

पक्षातून एखादा मोठा गट लोकप्रतिनिधींसह बाहेर पडला तर त्यात बेकायदेशीर काय? महेश जेठमालांनी यांचा युक्तिवाद

आमच्याकडे संख्याबळ जास्त

संख्याबळ जास्त असल्याने चिन्हाचा लवकर निर्णय घ्यावा, जेठमलानी यांची मागणी

आम्ही कागदपत्रे सादर केले आहेत. त्यामध्ये कोणत्याही त्रुटी नाहीत, जेठमलानी यांचा युक्तीवाद

ठाकरे गटाचे पदाधिकारी होते त्याचपद्धतीने शिंदे गटाचे पदाधिकारी नेमले गेले होते. त्यामध्ये कोणतीही चूक नाही. मोठ्या संख्येने लोकप्रतिनिधी बाहेर पडत आहेत, यामध्ये तथ्य आहे.

आधीच्या निकालांच्या शिंदे गटाच्या वकिलांकडून दाखला दिला जातोय. आदिक अली प्रकरणाचा जेठमलानी यांच्याकडून दाखल दिला जातोय. निवडणूक आयोगाने सर्व बाजू तपासाव्यात, कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद. निवडणूक आयोगाने सर्व बाजू तपासाव्यात सर्व कागदपत्रांची छाननी करावी कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद संपला

शिंदेगटाच्या कागदपत्रांमध्ये त्रुटी, सिब्बल यांचा युक्तिवाद

सुप्रीम कोर्टाच्या निर्णयापर्यंत कोणताही निर्णय घेऊ धका कोर्टाच्या निर्णयापर्यंत प्रतिक्षा करा कोर्टाचा निर्णय आधी येऊ द्या शिंदे गटाच्या कागदपत्रांमध्ये त्रुटी असल्याची कपिल सिब्बल यांचा दावा

अधिक वाचा  पुण्यात आता पुढील 4 दिवस पावसाचा धुमाकूळ होणारं?; विजांच्या कडकडाटासह हवामान खात्याचा ‘येलो अलर्ट’

शिंदे गटाची अनेक प्रतिज्ञापत्र बोगस

चिन्हाचा निर्णय आताच घेऊ नका, सुप्रीम कोर्टाच्या निर्णयापर्यंत वाट पाहावी, अशी विनंती काही लोकांना घेऊन पक्षातून बाहेर पडणं बेकायदेशीर आहे.

आज निकाल येण्याची शक्यता कमी

धनुष्यबाणाच्या सुनावणीवर आज अंतिम निकाल येण्याची शक्यता फार कमी, सूत्रांची माहिती आज दोन्ही बाजूचे वकिल युक्तीवाद करणार, नंतर निकाल या आठवड्यात अंतिम निकाल येऊ शकतो, पण आज अंतिम निकाल येणार नाही, सूत्रांची माहिती

शिवसेनेतील फूट काल्पनिक, कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद

शिवसेनेतील फूट कपोकल्पित आहे. शिंदे गट हे वास्तव नाही. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील शिवसेनाच खरी शिवसेना आहे. शिवसेनेत फूट झालेली नाही. जे आमदार बाहेर पडले आहेत ते त्यांच्या इच्छेने बाहेर पडले आहेत. पक्षातून बाहेर पडले ते वेगळ्या गटाचे आहेत. शिंदे गट हा शिवसेना नाही.

शिवसेना फुटीचा पक्षावर कोणताही परिणाम झालेला नाही. ही फूट ग्राह्य धरु नये. ती काल्पनिक असू शकते.

कपिल सिब्बल यांनी पक्षाची घटना वाचायला सुरुवात केली.
ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद सुरू

कपिल सिब्बल यांच्याकडून कागदपत्रे आयोगासमोर ठेवण्यात आले

सुनावणीच्या कामकाजाला सुरुवात, लवकरच युक्तीवादाला होणार सुरुवात

शिंदे गटाचे वकील महेश जेठमलानी आणि ठाकरे गटाचे कपिल सिब्बल केंद्रीय निवडणूक आयोगात उपस्थित निवडणूक आयोगाचे मुख्य अधिकारी, आयुक्त आणि दोन्ही गटाचे 20 पेक्षा जास्त वकील आयोगात दाखल ठाकरे गटाकडून अनिल देसाई, अनिल परब हे नेते उपस्थित तर शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे सुनावणीला हजर

अद्याप युक्तीवाद सुरु झालेला नाही

केंद्रीय निवडणूक आयोगात दोन्ही गटाचे एकूण 25 वकील

केंद्रीय निवडणूक आयोगात दोन्ही गटाचे एकूण 25 वकील

एवढ्या वकिलांची फौज सुनावणीसाठी उपस्थित असणार

शिंदे गटाकडून महेश जेठमलानी आणि ठाकरे गटाकडून कपिल सिब्बल यांची टीम