मुंबई : जून 2022 मध्ये शिवसेनेत झालेल्या राजकीय भुकंपानंतर जवळपास रोजच महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे ट्वीस्ट येत आहेत. याचाच पुढचा अंक आता लिहिला जातोय का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. याला कारण ठरत आहे ते येऊ घातलेल्या विधानपरिषद निवडणुका. नाशिक पदवीधर मतदारसंघात काँग्रेसवर मोठी नामुष्की ओढावली आहे.

नाशिक पदवीधर निवडणुकीसाठी काँग्रेसने सुधीर तांबे यांना उमेदवारी दिली, यासाठी त्यांना एबी फॉर्मही देण्यात आला. पण सुधीर तांबे यांनी उमेदवारी अर्जच दाखल केला नाही. सुधीर तांबे यांच्याऐवजी त्यांचा मुलगा सत्यजीत तांबे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. या निवडणुकीसाठी आपण फक्त महाविकासआघाडीच नाही तर भाजपचाही पाठिंबा मागणार असल्याचं सूचक विधान सत्यजीत तांबे यांनी केलं आहे.

अधिक वाचा  अजित पवारांची ताकद वाढणार?; ‘हा’ बडा नेता राष्ट्रवादीत येणार मुंबईसह अन्य ठिकाणीही फायदा

सुधीर तांबे आणि सत्यजीत तांबे यांच्या या निर्णयामुळे काँग्रेसवर मात्र मोठी नामुष्की ओढावली आहे. सत्यजीत तांबे हे महाराष्ट्रातले काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांचे भाचे आहेत. नाशिक पदवीधर संघाच्या निवडणुकीत सत्यजीत तांबे भाजपकडून उमेदवारी अर्ज दाखल करतील, अशी चर्चा होती. शेवटच्या क्षणापर्यंत तांबे पिता-पुत्रांनी उमेदवारी अर्ज दाखल केला नव्हता. वेळ संपण्याच्या अवघ्या काही मिनिटं आधी हे पिता-पूत्र फॉर्म भरण्यासाठी आले, पण नेमकं कोण फॉर्म भरणार आणि कोणत्या पक्षाकडून? याबाबतचा सस्पेन्स कायम होता. फॉर्म भरल्यानंतर सुधीर तांबे आणि सत्यजीत तांबे यांनी बाहेर येऊन अखेर हा सस्पेन्स संपवला.

अधिक वाचा  शेतकरी संघटना आक्रमक; गुजरातमधील कांदा निर्यातीस परवानगी, महाराष्ट्रातील कांद्यास नकार

फडणवीसांकडून करेक्ट कार्यक्रम?

सुधीर तांबे आणि सत्यजीत तांबे या पिता-पुत्रांनी घेतलेल्या या भुमिकेमुळे काँग्रेसची मात्र मोठी अडचण होणार आहे. पण तांबे पिता-पुत्रांनी घेतलेली ही भूमिका म्हणजे देवेंद्र फडणवीसांनी केलेला काँग्रेसचा करेक्ट कार्यक्रम तर नाही ना? अशा चर्चा सुरू झाल्या आहेत. याला कारण ठरतंय 36 दिवसांपूर्वी देवेंद्र फडणवीसांनी केलेलं एक विधान.
7 डिसेंबर 2022 ला सत्यजीत तांबे यांच्या सिटीझनविल या पुस्तकाच्या मराठी अनुवादाचं प्रकाशन झालं. या कार्यक्रमात काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात तसंच देवेंद्र फडणवीसही आले होते. या कार्यक्रमात बोलताना सत्यजीत तांबे यांच्यावर आमचं लक्ष असल्याचं फडणवीस म्हणाले होते.

अधिक वाचा  निवडणुकीच्या धामधुमीत राज्याला मोठा धक्का ; शालेय शिक्षण विभागाच्या खात्यातून 47 लाख 60 हजार चोरीला

‘खरंतर बाळासाहेब माझी तक्रार आहे, तुम्ही किती दिवस असे नेते बाहेर ठेवणार आहात. जास्त दिवस बाहेर ठेवू नका, आमचाही डोळा मग त्यांच्यावर जातो. चांगली माणसं जमाच करायची असतात’, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. देवेंद्र फडणवीस यांच्या या विधानानंतर सत्यजीत तांबे यांनीही या कार्यक्रमात सूचक वक्तव्य केलं होतं. देवेंद्र फडणवीस यांना चांगल्या लोकांची पारख आहे, असं म्हणत सत्यजीत तांबे यांनी फडणवीस यांचं कौतुक केलं होतं.