सांगली – इस्लामपूर मधील त्या करोना बाधित कुटुंबाच्या संपर्कात आल्याने आणखीन एकास करोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले. यामध्ये त्या लहान मुलाचा समावेश असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे आता इस्लामपूर मधील २४ आणि पेठ वडगावमधील १ अशी एकूण संख्या २५ झाली आहे. या सर्वांवर मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत.

दरम्यान, दिनांक 28 मार्च रोजी ‘एनआयव्ही’ कडून प्राप्त झालेल्या अहवालापैकी एका व्यक्तीचा तपासणी अहवाल करोना पॉझिटिव्ह आला आहे. तर उर्वरित दोघांचे स्त्राव निगेटिव्ह आले आहेत. ज्या व्यक्तीचा स्त्राव पॉझिटिव्ह आला आहे, तो मिरज येथील आयसोलेशन कक्षामध्ये असून इस्लामपूर येथील ज्या कुटुंबातील रुग्णांचे स्त्राव पॉझिटिव्ह आले आहेत, त्यांच्याशी संबंधितच सदरची व्यक्ती आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ अभिजित चौधरी यांनी दिली आहे.

अधिक वाचा  मोदींची तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ महाराष्ट्रातून जातीय गणितांचा असा साधला समतोल: या नेत्यांना संधी