काँग्रेसमध्ये साधारण 24 वर्षांनंतर पक्षाच्या अध्यक्षपदासाठी निवडणूक होत आहे. काँग्रेसचे खासदार राहुल गांधींनी अध्यक्षपद न स्वीकारण्याची भूमिका घेतल्यामुळं ही निवडणूक घेतली जात आहे. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि खासदार शशी थरूर यांच्यात थेट लढत होणार अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

दरम्यान, गेहलोत यांनी पहिल्यांदाच यावर थेट भाष्य करून निवडणूक लढवणार असल्याचं जाहीर केलं. तर, शशी थरूर यांनी आज आपला प्रतिनिधी पाठवून उमेदवारी अर्ज मागवला आहे. त्यामुळं या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठी रंगत पहायला मिळणार आहे. मात्र, असं असताना G-23 गटातील नेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मोठं विधान केलं आहे.

अधिक वाचा  ‘या निवडणुकीत असे पाडा की पाच पिढ्या घरी बसल्या पाहिजे’, मनोज जरांगे आक्रमक

आम्ही कधीच एका कुटुंबाच्या विरोधात नव्हतो, पण..’

काँग्रेसला पार्ट टाइम नव्हे, तर फुल्ल टाइम अध्यक्षाची गरज आहे. अशोक गेहलोत जर एकाच वेळी काँग्रेस अध्यक्ष आणि राजस्थानच्या मुख्यमंत्री पदावर राहिले तर आमचा विरोध राहील, असं त्यांनी म्हंटलंय. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, आम्ही कधीच एका कुटुंबाच्या विरोधात नव्हतो. पण, जो कोणी अध्यक्ष होईल तो निवडणुकीच्या माध्यमातून व्हावा. राहुल गांधींना आजही निवडणूक लढवायची असेल आणि त्यांनी फॉर्म भरला तर आम्ही त्यांचं स्वागत करू, असंही चव्हाण म्हणाले.

‘काँग्रेसला पूर्णवेळ अध्यक्ष असावा’

अधिक वाचा  अखेर मुंबई इंडियन्समधील भांडण आलं समोर, मॅनेजमेंटसमोर कोणी केली हार्दिकची तक्रार?

यावेळी चव्हाण यांनी सोनिया गांधींचेही आभार मानलेत. काँग्रेसला पूर्णवेळ अध्यक्ष असावा ही आमची मागणी पूर्ण झाली आहे. आता या निवडणुका पारदर्शीपणे पार पडाव्यात, असं मत पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केलं. अशोक गेहलोत एक ज्येष्ठ नेते आहेत, चांगले नेते आहेत. त्यांना पाठिंबा द्यायचा की नाही हे अजून ठरवायचं आहे. मात्र, त्यांना दोन्ही पदांवर कायम राहायचं असेल तर आमचा विरोध असेल, असंही त्यांनी स्पष्ट केलं.