भाद्रपद महिना भगवान श्रीकृष्ण आणि श्री गणेशाच्या उपासनेसाठी समर्पित आहे. भगवान श्रीकृष्ण आणि श्री गणेश या दोघांचाही जन्मदिवस याच महिन्यात आहे. भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थीला असंख्य ठिकाणी मनोभावे गणपतीची स्थापना केली जाते. हिंदू धर्मात प्रत्येक महिन्याचे स्वतःचे वेगळे सांस्कृतिक महत्त्व आहे. या वर्षीची गणेश चतुर्थी 31 ऑगस्ट म्हणजे बुधवारी आहे. गणेश चतुर्थी ही बुधवारी असल्याने गणेश चतुर्थीचे महत्त्व असंख्य पटींनी वाढले आहे. कारण बुधवार हा दिवस गणपतीला समर्पित असून या दिवशी गणेश चतुर्थी आल्याने या चांगला योग जुळून आला आहे.

गणेश चतुर्थीचा शुभ मुहूर्त आणि पूजेची पद्धत:

हिंदू कॅलेंडरनुसार, यावेळी गणेश चतुर्थी 31 ऑगस्टपासून सुरू होत आहे. चतुर्थी तिथी 30 ऑगस्ट, मंगळवारी दुपारी 3:33 वाजता सुरू होईल आणि 31 ऑगस्ट रोजी दुपारी 3:22 वाजता समाप्त होईल. उदय तिथीनिमित्त गणेश चतुर्थी व्रत 31 ऑगस्ट रोजी ठेवण्यात येणार आहे. या दिवशी गणेशाची पूजा करण्याचा शुभ मुहूर्त दुपारी 11:05 ते 1:38 पर्यंत आहे. त्याचवेळी 09 सप्टेंबर 2022 रोजी गणेश विसर्जन होणार आहे

अधिक वाचा  मणिपूरमध्ये कुकी बंडखोरांचा मोठा हल्ला, भारताचे 2 जवान शहीद

गणेश चतुर्थीच्या दिवशी गणेशमूर्तीची स्थापना केली जाते. ढोल-ताशांच्या गजरात मोठ्या आनंदाने घराघरात गणपती विराजमान केला जातो. त्यांची 10 दिवस घरात ठेवून मनोभावे पूजा केली जाते.

  • गणेश चतुर्थीच्या दिवशी सकाळी आंघोळ करून स्वच्छ कपडे घालावे.
  • पाटावर लाल कापड टाकून गणेशमूर्तीची स्थापना केली करावी.
  • बाप्पाला पंच अमृताने अभिषेक करावा.
  • गणपती बाप्पाला गुलाल, अक्षदा, दुर्वा, फुले अर्पण करावी.
  • गणपतीला नैवेद्य (21 मोदक) अर्पण करावे.

या’ मंत्रांनी करा पूजा, सूख-समृध्दी येईल

घरोघरी विधीवत गणरायाची स्थापना केली जाते. हिंदू धर्मात गणेशाला प्रथम पूज्य मानले जाते. गणेशोत्सावात गणरायाची चतुर्थीला स्थापना होते. तर अनंत चतुर्दशीला विसर्जन केले जाते. याकाळात काही मंत्र विशेष फलदायी समजले जातात. जाणून घेऊ हे मंत्र….

अधिक वाचा  भाजपसाठी रणधुमाळीत दुख:द बातमी; ठाकूर समाजाच्या एकमेव उमेदवाराचं निधन

-: प्रतिष्ठापनेच्या वेळी व नंतर म्हणायचे मंत्र :-

वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभ
निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा
ओम् एकदन्ताय विद्धमहे,
वक्रतुण्डाय धीमहि,
तन्नो दन्ति प्रचोदयात्
ओम् गं गणपतये नमः
ओम् गजाननाय नमः
ओम् लम्बोदराय नमः
ओम् श्रीं ह्रीं क्लीं ग्लौं गं गणपतये वर वरद सर्वजनं मे वशमानय स्वाहा
एकदन्ताय विद्‌महे, वक्रतुण्डाय धीमहि
तन्नो दन्ती प्रचोदयात्
ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः

-: गणेश विसर्जन मंत्र :-

गच्छ गच्छ सुरश्रेष्ठ स्वस्थाने परमेश्वर
मम पूजा गृहीत्मेवां पुनरागमनाय च

शेवटी आरती आणि मंत्र जप करावा. गणेश चतुर्थीच्या दिवशी घरात बाप्पाची स्थापना करून त्याची मनोभावे पूजा केल्याने बाप्पा भक्तांचे सर्व अडथळे दूर करतात, अशी श्रद्धा आहे. त्यांचे संकट दूर करा आणि त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण करा.