माझ्या प्रभागातील प्रत्येक महिला सक्षम झाली पाहिजे आणि त्यासाठी मी नेहमी प्रयत्नशील राहिल असे प्रतिपादन मा नगरसेविका जयश्री गजानन मारणे यांनी केले. रौद्र शंभो प्रतिष्ठान तर्फे गोकुळाष्टमी औचित्य साधून महिलांसाठी भव्य लकी ड्रॉ आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी निवेदक अस्मिता मिराणे यांनी यांनी कार्यक्रमाचे सुदंर सुत्रसंचलन करत महिलांंचा उस्ताह वाढवला.

रौद्र शंभो प्रतिष्ठान आयोजित लकी ड्रॉ कार्यक्रमास महिलाचा उस्फुर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी प्रथम क्रमांकाचा एल ईडी टिव्ही पुजा शेलार, द्वितीय क्रमांकाचा फ्रिज तेजस्वीनी पंडीत, तृतीय क्रमांकाचा वॉशिंग मशीन स्नेहल दगडे, चतुर्थ क्रमांकाचा माधवी कंधारे पिठाची गिरणी, पाचवा क्रमांकाचा ओव्हन शकुंतला कोकाटे या सर्व महिलांना पारितोषिक माजी सभागृह नेते शंकर उर्फ बंडू केमसे आणि नगरसेविका जयश्री मारणे यांच्या हस्ते देण्यात आले. यावेळी सहभागी होणाऱ्या प्रत्येक महिलेला भेटवस्तू देण्यात आली. कार्यक्रमाचे आयोजन अतुल ससार यांनी केले होते.

अधिक वाचा  माहिती अधिकार कार्यकर्त्याला शासकीय इमारतीच्या आवारात मारहाण; मुक्त पत्रकारावर गुन्हा दाखल