युक्रेनवरील हल्ल्याबद्दल अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी रशियाचा निषेध केला. राष्ट्राध्यक्ष जो बायडन म्हणाले, रशिया युक्रेनवर हल्ला करेल, असा आम्हाला पूर्वीपासून अंदाज होता. बायडन म्हणाले की, पुतिन हे आक्रमक आहेत, त्यांनी युद्धाचा मार्ग निवडला. मात्र या हल्ल्याचे परिणाम पुतिन आणि त्यांचा देश रशियाला भोगावे लागतील. बायडन म्हणाले की, जगातील बहुतांश देश रशियाच्या विरोधात आहेत. आम्ही रशियावर आणखी कडक निर्बंध लादणार आहोत.

बायडन म्हणाले की, या युद्धाचा फटका अमेरिकेलाही बसू शकतो. युक्रेनमध्ये अडकलेल्या अमेरिकन नागरिकांच्या सुरक्षेला आमचं प्राधान्य असल्याचं त्यांनी सांगितलं. सायबर हल्ल्यांना उत्तर देण्यासाठी आम्ही सज्ज आहोत.

अधिक वाचा  सांगलीच्या ‘हँग ऑन’ कॅफेत गुंगीचे औषध देऊन युवतीवर अत्याचार; शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्तान संघटनेने कॅफे फोडाले

युक्रेनमध्ये सैन्य पाठवणार नाही : बायडन

युक्रेनमध्ये आपलं सैन्य पाठवणार नसल्याचं बायडन यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केलं. दरम्यान, बायडन म्हणाले की, युक्रेनमध्ये यूएस सैन्य नाही पण ‘नाटो (NATO) प्रदेशाच्या प्रत्येक इंचाच्या जमिनीचं रक्षण करण्यास अमेरीका कटिबद्ध आहे. एवढंच नाही तर रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याशी चर्चा करण्याचा आपला कोणताही विचार नसल्याचंही बायडन यांनी सांगितलं.

हा पूर्वनियोजित हल्ला : बायडन

बायडन म्हणाले की, रशियन सैन्यानं चिथावणी न देता युक्रेनवर क्रूर हल्ला केला आहे. अनेक महिन्यांपासून हा पूर्वनियोजित हल्ला असल्याचं त्यांचं म्हणणं आहे.

बायडन म्हणाले की, आम्ही G-7 देश मिळून रशियाला प्रत्युत्तर देऊ. VTB सह आणखी 4 रशियन बँकांवर निर्बंध लादले जातील. पुढे बोलताना ते म्हणाले की, रशियाचे अध्यक्ष पुतिन यांच्याशी बोलण्याचा माझा कोणताही विचार नाही. त्याला पूर्वीच्या सोव्हिएत युनियनची पुनर्स्थापना करायची आहे. मला वाटतं की, त्यांच्या महत्त्वाकांक्षा या क्षणी आपण जिथे आहोत, त्याच्या अगदी विरुद्ध आहेत.

अधिक वाचा  पुण्यात आता पुढील 4 दिवस पावसाचा धुमाकूळ होणारं?; विजांच्या कडकडाटासह हवामान खात्याचा ‘येलो अलर्ट’

बायडन यांनी रशियावर कठोर निर्बंध लादण्याचा निर्णय घेतला आहे. एवढंच नाहीतर अमेरिकेकडून रशियावर निर्यात निर्बंधही लादण्यात आले आहेत. महत्त्वाचं म्हणजे, या निर्बंधांचा मोठा फटका रशियाला बसेल, असंही बायडन म्हणाले. सोबतच रशियातील उद्योगपती आणि अब्जाधीशांना टार्गेट करण्याचा प्रयत्न करत आर्थिक कोंडी करणार असल्याचा सूचक इशाराही जो बायडन यांनी दिला आहे.

त्यासोबतच बायडन यांनी तेलाचे भाव कमी करण्यासाठी अमेरीकेतील तेलाच्या राखीव बफरमधून तेल बाजारात देण्याचं सांगितलं आहे. रशियाला स्विफ्ट बँकिंग प्रणालीपासून वेगळं केलं. रशियाच्या आर्थिक नाड्या आवळल्या, या निर्णयामुळे काही दिवसांत रशियात परदेशी चलनाचा तुटवडा होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.