मुंबई 11 मे: कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण असल्याने सगळ्या देशाचं लक्ष महाराष्ट्र आणि मुंबईकडे लागलं आहे. मुंबई आणि पुण्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने सरची चिंता वाढली आहे. मात्र राज्यात आता इतर शहरांमध्येही कोरोनाचा उद्रेक झाल्याने रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. औरंगाबाद, सोलापूर आणि मालेगाव सारख्या शहरांमध्ये रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने सरकार समोर आव्हान निर्माण झालं आहे. राज्यात आज 1230 नवे रुग्ण आढळून आले. तर 36 जणांता मृत्यू झाला. त्यामुळे एकूण रुग्णांची संख्या 23401 एवढी झाली आहे.
मुंबईत आज तब्बल 791 रुग्णांची वाढ झाली. तर 587 रुग्णांना डिस्चार्ज दिला गेला. आजच्या 36 पैकी 20 मृत्यू मुंबईतले आहेत. मुंबईतल्या रुग्णांची संख्या 14 हजार 355वर गेली आहे. तर मृत्यूचा आकडा 528
पुणे विभागातील 1 हजार 237 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 3 हजार 365 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण 1 हजार 953 आहेत. विभागात कोरोनाबाधीत एकुण 175 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 115 रुग्ण गंभीर असून उर्वरीत निरीक्षणाखाली आहेत, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी दिली.
औरंगाबादमधल्या कोरोनाबाधितांची संख्या 627 वर गेली आहे. तर 14 जणांचा मृत्यू झाला. तर 113 जणांना सुटी देण्यात आली. जळगावात आज चार कोरोना बाधित रूग्ण आढळले. त्यामुळे जिल्ह्याती एकूण संख्या 176 वर गेली आहे.
सोलापुरात आज कोरोनाचे 11 रुग्ण आढळले. रुग्णांची एकूण संख्या झाली 275 वर गेली आहे. तर 3 जणांचा आज मृत्यू झाला. त्यामुळे मृत्यूची संख्या 17 वर गेली आहे. आजपर्यंत 41 रुग्णांनी कोरोनावर मात केली. नाशिक जवळच्या मालेगावमध्ये रुग्णांची एकूण संख्या 562वर गेलीय. तर 24 जणांचा मृत्यू झाला.

अधिक वाचा  सहकारी संस्था निवडणुका विधानसभेमुळे पुन्हा स्थगित