जम्मू पुन्हा एकदा दुरेही बॉम्बस्फोटाने हादरले आहे. जम्मू शहरातील नरवाल भागात आज दुपारच्या सुमारास हे दोन बॉम्मस्फोट घडले. या घटनेत सहा जण जखमी झाले असून जखमींना जवळच्या सरकारी रुग्णालयात दाखल करण्याता आले आहे.

एनएनआयने दिलेल्या वृत्तानुसार, जम्मू शहरातील नरवाल भागात आज दुपारच्या सुमारास दोन बॉम्बस्फोटाच्या घटना घडल्या आहेत. या घटनेनंतर पोलिसांनी शहरात नाकेबंदी केली असून या बॉम्बस्फोटाची जबाबदारी अद्याप कोणत्याही संघटनेनं घेतली नसल्याची माहिती जम्मूचे अतिरिक्त पोलीस महासंचालक मुकेश सिंग यांनी दिली आहे.

अधिक वाचा  नागपूर हिंसेनंतर औरंगजेबाची कबर हटवण्याची मागणी सुरक्षा कुणाकडे? औरंगजेबाची कबर कुणाच्या अख्त्यारित सरकार ती हटवू शकते? तोडफोड झाल्यास काय होऊ शकते शिक्षा?