पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळ, आसाम ही चार राज्ये आणि पुदुच्चेरी या केंद्र शासित प्रदेशातील निवडणुकीचे निकाल 2 मे रोजी जाहीर होणार आहेत. यासाठीचे एक्झिट पोल्स आज जाहीर झाले आहेत. एकूण 294 जागांपैकी 156 जागा मिळवत ममता बॅनर्जी पश्चिम बंगालमध्ये आपली सत्ता राखतील, पण भाजपलाही इथे 121 जागा मिळण्याचा अंदाज ‘पोल ऑफ पोल्स’ म्हणजे सगळ्या पाहण्यांच्या पाहणीमध्ये म्हटलं आहे. सहा पाहण्यांच्या सरासरीमधून हे निवडणूक अंदाज मांडले आहेत. तामिळनाडूमध्ये सध्या विरोधीपक्ष असणारा द्रमुक पक्ष बाजी मारण्याचा अंदाज यात मांडलाय. तर आसाममध्ये काँग्रेसची निराशा होण्याची शक्यता असल्याचं तर केरळमध्ये डाव्या आघाडीचा विजय होण्याची शक्यता असल्याचं या पोल ऑफ पोल्समध्ये म्हटलंय.

निवडणूक होत असलेली पाचही राज्य बिगर-हिंदी भाषिक राज्यं म्हणून ओळखली जातात. यामध्ये पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस, तामिळनाडूत अण्णाद्रमुक, केरळमध्ये डावे पक्ष तर आसाममध्ये भाजप सत्तेत आहे. पुदुच्चेरीमध्ये काँग्रेसची सत्ता होती. पण पश्चिम बंगालमधली लढत ही सगळ्यात लक्षवेधी ठरण्याचा राजकीय तज्ज्ञांचा अंदाज आहे.

पश्चिम बंगाल एक्झिट पोल
एकूण 294 जागा असणाऱ्या पश्चिम बंगाल विधासभेवर वर्चस्व मिळवण्यासाठी 148 जागांचा आकडा पार करणं गरजेचं आहे. इथे ममता बॅनर्जींचा तृणमूल काँग्रेस पक्ष बाजी मारेल असा अंदाज रिपब्लिक टीव्ही वगळता इतर बहुतेक माध्यमांच्या एक्झिट पोल्सनी व्यक्त केला आहे.

एबीपी – सी व्होटर          CNN न्यूज 18              रिपब्लिक टीव्ही – CNX

अधिक वाचा  मुस्लीमांचा जर काँग्रेससाठी फतवा तर हिंदू म्हणून आज मी सांगतो मुरलीधर मोहोळ यांना विजयी करा: राज ठाकरे

तृणमूल काँग्रेस : 152-164            162                     128-138

भाजप : 109-121                     115                      138-148

काँग्रेस+: 14-25                         15                       11-21

केरळ एक्झिट पोल
एक्झिट पोल्सच्या अंदाजानुसार केरळमध्ये डाव्या आघाडीची पुन्हा सत्ता येणार असल्याचं दिसतंय. केरळमध्ये 140 जागांची विधानसभा असून बहुमतासाठी 71 जागांची गरज आहे.

इंडिया टुडे – अॅक्सिस माय इंडिया     रिपब्लिक – CNX       एबीपी – सी व्होटर

डावी आघाडी : 104-120                   72-80                       71 – 77

संयुक्त लोकशाही आघाडी : 20-36         58-64                         62-68

एनडीए : 0-2                                    1-5                            0-2

अधिक वाचा  ‘सांगा कुठे यायचं, मी… ; ओवैसींनी चॅलेंज स्वीकारल्यानंतर आता नवनीत राणा यांचं उत्तर

तामिळनाडू एक्झिट पोल

तामिळनाडूमध्ये सत्ताधारी अण्णाद्रमुक (AIADMK) आणि विरोधी द्रमुक पक्ष (DMK) आमनेसामने आहेत. इथे एकाच टप्प्यात संपूर्ण मतदान झालं. 234 सदस्यांच्या तामिळनाडू विधानसभेवर वर्चस्व मिळवण्यासाठी 118 जागांचा पल्ला महत्त्वाचा आहे. सध्या विरोधी पक्ष असणारा द्रमुक पक्ष इथे बाजी मारण्याची शक्यता असल्याचं एक्झिट पोल्सनी म्हटलंय.

रिपब्लिक टीव्ही – CNX                           P-Marq 

अण्णाद्रमुक (AIADMK) : 58-68         अण्णाद्रमुक (AIADMK) : 40-65

द्रमुक : 160-170                            द्रमुक :165 – 190

AMMK आघाडी : 4-6                       AMMK आघाडी : 1-3

आसाम एक्झिट पोल

आसाममध्ये 126 जागांची विधानसभा असून बहुमतासाठी 64 जागांची गरज आहे. काही एक्झिट पोलमध्ये त्रिशंकू अवस्थेचा तर काही एक्झिट पोल्समध्ये भाजपला पुन्हा स्पष्ट बहुमत मिळणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आलाय.

इंडिया टुडे- अॅक्सिस माय इंडिया    रिपब्लिक टीव्ही-Cnx    एबीपी – सी व्होटर

भाजप आघाडी : 75-85                      74-84                   58-71

अधिक वाचा  दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांना सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा; 1 जूनपर्यंत अंतरिम जामीन मंजूर

काँग्रेस आघाडी : 40-50                      40-50                   53-66

इतर : 1-4                                        1-3                      0-5

पुद्दुचेरी एक्झिट पोल

केंद्रशासित प्रदेश असलेल्या पुद्दुचेरीत विधानसभा निवडणुकीत भाजपला स्पष्ट बहुमत असल्याचा अंदाज एक्झिट पोल्समध्ये वर्तवण्यात आला आहे. पुद्दुचेरी विधानसभेच्या एकूण 30 जागा आहेत.

रिपब्लिक-सीएनएक्स                        एबीपी-सी व्होटर

एनडीए : 16-20                            एनडीए : 19-23

एसडीए : 11-13                              एसडीए : 6-10

इतर : 0                                         इतर : 1-2

आसाममधल्या 126, केरळमधील 140, तामिळनाडूच्या 234, पश्चिम बंगालच्या 294 तर पुद्दुचेरीमधल्या 30 जागांसाठी या निवडणुकांमध्ये मतदान झालं. या पाचही राज्यांची मतमोजणी 2 मे रोजी होऊन निकाल लागतील.