लातूर : खरीप हंगामातील सोयाबीन-कापसाचे दर घटण्यामागे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील मागणी, वाढलेली आवक हे मुद्दे कारणीभूत ठरले असले तरी या शेतीमालाचे दर वाढीमागे शेतकऱ्यांची भूमिका ही महत्वाची राहिलेली आहेच. आता खरीप हंगाम अंतिम टप्यात आहे. सबंध चार महिने सोयाबीनच्या अन् कापसाच्या दरात कायम चढ-उतार राहिलेले आहेत. मात्र, शेतीमालाच्या बाजारपेठेतले अर्थकारण शेतकऱ्यांच्या लक्षात आल्यानेच यंदा शेतकरी घेतील त्याच भूमिकेवर दर हे ठरलेले आहेत. दरात घट झाली शेतीमालाची साठवणूक अन् मागणी वाढली की, टप्प्याटप्प्याने विक्री हाच फार्म्युला शेवटपर्यंत शेतकऱ्यांच्या कामी आला आहे. त्यामुळेच आज कापसाला विक्रमी दर मिळत आहे तर सोयाबीन 6 हजार 300 वर स्थिरावलेले आहे.

अधिक वाचा  पत्रकाराच्या सतर्कतेने बेपत्ता व्यक्ती नातेवाइकांच्या स्वाधीन

शेतकऱ्यांनी वाढवली साठवण क्षमता

आतापर्यंत हंगाम सुरु झाला की, दराची तमा न करता थेट विक्री केली जात होती. शिवाय त्या शेतीमालाचे दर काय राहतील याचा अभ्यास शेतकरी करीतच नव्हते. परिणामी व्यापारी कमी किंमतीमध्ये खरेदी करुन शेतीमालाची साठणूक करीत होते व तोच शेतीमाल काही काळाने दुपटीने विक्री करीत होते. यंदा हंगामाच्या सुरवातीला देखील सोयाबीनला मूहुर्ताचा दर विक्रमी देऊन शेतकऱ्यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न झाला होता पण सोयाबीनला अपेक्षित दर असल्यावरच विक्री अन्यथा साठवणूक हे एकच धोरण शेतकऱ्यांनी यंदा ठरवले होते. त्यामुळे आवकही वाढली नाही आणि योग्य किंमतही मिळाली.

अधिक वाचा  फर्ग्युसन महाविद्यालयाचा परिसर दारूचा अड्डा;तब्बल ८०० दारुच्या बाटल्या सापडल्या 

सोयाबीनचे सूत्रच कापसालाही लागू

सोयाबीन आणि कापूस ही खरीप हंगामातील मुख्य पिके आहेत. कापसाची उत्पादकता घटूनही अपेक्षित दर मिळत नसल्याने शेतकऱ्याने विक्रीपेक्षा साठवणूकीवर भर दिला होता. शेतकऱ्यांच्या या निर्णयामुळे बाजारपेठेतली आवक मंदावली व व्यापाऱ्यांना चढ्या दराने कापसाची खरेदी करावी लागली होती. जिनिंग प्रोसेसमध्ये निम्म्यानेच कापसाचा पुरवठा होऊ लागल्याने मागणीत वाढ झाली. एकीकडे उत्पादकता कमी झाल्याचा अहवाल कृषी विभाग सादर करीत आहे तर दुसरीकडे कमी उत्पादन होऊनही शेतीमालाला किंमत नाही हे संयुक्तिक नसल्याने शेतकऱ्यांनी योग्य दर तर माल बाजारात ही भूमिका घेतली.

कापसाची वाटचाल 10 हजाराच्या दिशेने

अधिक वाचा  अभिजीत बिचुकलेने सलमान खानवर साधला निशाणा; म्हणाले

सध्या बाजारपेठेत मागणीच्या तुलनेत कापसाचा पुरवठा होत नाही. यंदा अतिवृष्टी आणि अवकाळीमुळे उत्पादनात घट झाली असली तरी पदरी पडलेल्या कापसाचे पैसेच करायाचे ही भूमिकाच शेतकऱ्यांनी घेतलेली आहे. त्यामुळे अपेक्षित दर मिळेपर्यंत कापसाची साठणूक शेतकऱ्यांनी केली होती. आता गेल्या चार दिवसांपासून कापसाच्या दरात वाढ होत आहे. खानदेश, नंदुरबार, बीड सर्वत्रच कापूस 9 हजार 500 रुपयांपेक्षा अधिकच्या दराने विकला जात आहे. त्यामुळे काही दिवसांमध्येच कापूस 10 हजाराचा टप्पा ओलांडेल असे मत व्यक्त होत आहे. सध्या कापसाला हमीभावापेक्षा दीपट दर मिळत आहे. शेतकऱ्यांनी आपली भूमिकाच बदलली नाही त्यामुळेच हे आजचे चित्र दिसत आहे.