पुणे : पुण्यातील कोरोना चे संकट लक्षात घेता या कोरोना विरुद्धच्या लढईसाठी पुणे शहर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने फाईट कोरोना या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात येणार असून कोथरुड एरंडवणा येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेना व राम बोरकर मित्रपरिवार यांच्यावतीने शिरिष तुपे यांच्या २८ व्या स्मृती दिनानिमित्त रक्तदान व प्लाजमा दान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. पुण्यातील कोरोना संकटाचे निवारण होईपर्यंत हे शिबिर सुरू राहणार असून दररोज सकाळी नऊ ते पाच दरम्यान नागरिकांना रक्तदान करता येणार आहे अशी माहिती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सचिव राम बोरकर यांनी दिली.

अधिक वाचा  पाच वर्षांपूर्वी मी चूक केली, माफी मागतो….शरद पवार कोणती चूक केली मान्य?

कोथरूड एरंडवणा येथे शिरीष तुपे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ गेले 28 वर्ष सातत्याने रक्तदान शिबिराचे आयोजन 17 एप्रिल रोजी करण्यात येते. याच दिवशी यंदाच्या वर्षी सातत्यपूर्ण रक्तदान शिबिर याचे आयोजन करण्यात आले आहे. नागरिकांना 17 एप्रिल पासून दररोज सकाळी नऊ ते पाच वाजेपर्यंत रक्तदान व प्लाजमादान करता येणार आहे.

कोरोना संकटाशी सामना करण्यासाठी नागरिकांनी रक्तदान व प्लाजमादान करून समाजामध्ये प्रबोधन करावे असे आवाहन राम बोरकर मित्र परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे. रक्तदान व प्लाजमा दान करणाऱ्यांना कोरोना योद्धे म्हणून सन्मानित करण्यात येणार आहे.