पुणे:ज्यूडोकॉन कराटे अकॅडमी महाराष्ट्र ,ऑल इंडिया कराटे & कुबडो असोसिएशन व बुडो मार्शल आर्ट असोसिएशन महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने डिसेंबर ते जानेवारी या कालावधीत 7 दिवसीय स्पेशल ज्युनिअर कमांडोज कॅम्प चे आयोजन महाबळेश्वर याठिकाणी करण्यात आले होते.

शिबिरामध्ये महाराष्ट्रतुन विविध जिल्ह्यातील अनेक मुलांनी उत्फुर्त असा सहभाग नोंदविला होता. शिबिरामध्ये आयोजित विविध उपक्रममध्ये सहभागी स्पर्धकांचा बक्षीस वितरण समारंभ श्री संत नामदेव हॉल काळेपडल हडपसर पुणे येथे संपन्न झाला.या शिबिरामध्ये पुणे जिल्ह्यातील कु.आयुष संतोष न्हावले या विध्यार्थ्यांने प्रथम क्रमांक पटकाविला,व्दितीय क्रमांक कु.सिध्दांत दिलीप लोहार तर तृतीय क्रमांक कु. यशवर्धन संदीप गजघाटे या विध्यार्थ्यांने मिळवून घवघवीत यश संपादन केले.

अधिक वाचा  पुण्यात 45 वर्षानंतर ‘या’ ठिकाणी घुमणार पंतप्रधानाचा आवाज अन् शहरात फक्तं रोड शो; यामुळे ठिकाण बदललं

यावेळी आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लाईफ केअर हॉस्पिटलचे संचालक डॉ प्रसाद जोगदंड , प्रमुख उपस्थिती मराठवाडा बहुद्देशीय प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष महेश टेळेपाटील,जनस्वराज्य फाउंडेशन चे महाराष्ट्र उपाध्यक्ष मछिंद्र गायकवाड,वडकी ग्रामपंचायत नवनिर्वाचित सदस्य सागर मोडक, प्रा. अरविंद मोडक,साप्ताहिक पोलीस वॉरंट चे संपादक प्रियंका गायकवाड, हडपसर प्रतिनिधी संतोष कांबळे, सौ. अनिता गोरे ,अंकुश पारवे,कृष्णा सुतार आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि प्रास्ताविक जनस्वराज्य फाऊंडेशनचे संस्थापक लहू पारवे यांनी केले, आभार कराटे प्रशिक्षक माधुरी तौर यांनी केले. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने पालक आणि नागरिक उपस्थित होते.