पुणे लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सैनिक समाज पार्टीच्या वतीने निवृत्त सेनानी कर्नल सुरेश पाटील खासदारकीची निवडणूक लढवणार आहेत. पाटील हे येत्या २४ तारखेला पुणे लोकसभेसाठी उमदेवारी अर्ज भरणार आहेत. पुणे श्रमिक पत्रकार भवन येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी अशी माहिती दिली.

पुणे शहराचा विकास करण्यासाठी व नागरीकांच्या पाणी प्रश्न पर्यावरणाचा प्रश्न वाहतुकीचा प्रश्न आरोग्य व्यवस्थेचा प्रश्न, सहकारी शाळांची दुरवस्था, व्यापाऱ्यांचे प्रश्न व  बेरोजगारीचा प्रश्न महिलांवर होणाऱ्या अन्याय अत्याचाराचा प्रश्न, राष्ट्रीय एकात्मेतचा संदेश देण्यासाठी पुणे शहाराच्या नागरीकांचा पाण्यासारख्या गंभीर समस्याचा असे अनेक प्रश्न आहेत. पर्यावरणावर गेली तीन दशके सतत कार्यरत असणारे १९७१ च्या भारत-पाकच्या युध्दात देशासाठी शत्रुचा हल्यात जखमी झालेले होते.

अधिक वाचा  मोदी काहीही बोलतात होय, मी भटकती आत्मा अन् जनतेसाठी शंभर वेळा… शरद पवारांचं मोदींना हे उत्तर?

देशावर जेंव्हा जेव्हा मोठी संकट आली त्यावेळी फक्त आणि फक्त भारतीय सैन्याने मदत करून भारतीय नागरीकांचा जीव वाचवला आहे. मग देशाच्या निवडणूक प्रक्रियेमध्ये भारतीय निवृत्त सैनिक पण त्यामध्ये उतरूण जनतेसाठी न्याय देऊ शकतात आणि कुठल्याही पक्षाने, आर्मी मधील निवृत्त सेनानीला पुणे लोकसभेकरीता उमेदवारी दिली नाही हे दुदैव आहे म्हणून आर्मी मधील सैन्याचे प्रचंड प्रश्न प्रलंबित पडलेले आहेत त्याला वाचा फोडण्यासाठी सैनिक समाज पार्टीच्या वतीने उमेदवार म्हणून लढवणार आहे. अशी माहिती कर्नल सुरेश पाटील यांनी दिली.