अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज (1 फेब्रुवारी) वर्षभराच्या खर्चाचं नियोजन किंवा आराखडा सादर करत आहेत. निर्मला सीतारामन यांनी या अर्थसंकल्पात कररचनेत कोणताही बदल सुचवला नाही. प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष कर तसेच आयात करातही बदल होणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. निर्मला सीतारामन यांनी केवळ 58 मिनिटांत आपले भाषण केले. 2020 मध्ये त्यांनी अर्थसंकल्पीय भाषण 2 तास 42 मिनिटे केले होते.

10 वर्षांच्या कार्यकाळात भारताच्या अर्थव्यवस्थेने झेप घेतली – अर्थमंत्री

निर्मला सीतारामन यांनी आपल्या भाषणाच्या सुरुवातीलाच गेल्या 10 वर्षांच्या कार्यकाळात भारताच्या अर्थव्यवस्थेने झेप घेतल्याचं निरीक्षण व्यक्त केलं.

सामाजिक न्याय हे आमच्या सरकारचं धोरण आहे. जास्तीत जास्त नोकऱ्या तयार करणं हे आमचं ध्येय आहे.

गेल्या दहा वर्षांत आमच्य़ा सरकारने कामात पारदर्शकता आणली आहे

Governance, Development & Performance – या GDP वर सरकारचा भर

अधिक वाचा  रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा सलग पाचवा विजय, गुणतालिकेत बदल

गेल्या दहा वर्षांत FDI चं प्रमाण त्याआधीच्या दहा वर्षांपेक्षा दुप्पट झालं – 59,600 कोटी डॉलर्स

देशात 3आर्थिक रेल्वे कॉरिडॉर

पायाभूत सुविधांसाठी11,11,111 कोटींची तरतूद

5 इंटिग्रेटेड अॅक्वा पार्क स्थापन करणार

इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन

40000 बोगी या वंदे भारतच्या तोडीच्या करणार

मेट्रो रेल्वे, नमो भारत आणखीन शहरात आणणार

इ-वाहनांच्या चार्जिंगसाठी पायाभूत सुविधा वाढवणार

जय जवान, जय किसान, जय विज्ञान – जय अनुसंधान

जय जवान, जय किसान, जय विज्ञान, जय अनुसंधान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लालबहादूर शास्त्री यांच्या आणि अटलबिहारी वाजपेयी यांच्या घोषणेत नवी जोड दिली आहे असं निर्मला सीतारामन यांनी सांगितलं. त्या म्हणाल्या, जय जवान, जय किसान, जय विज्ञान, जय अनुसंधान, अशी ती घोषणा आहे. नवसंशोधनासाठी 1 लाख कोटींचा निधी – 50 वर्षांसाठी व्याजमुक्त किंवा कमी व्याजाने कर्जरुपात देण्यात येईल.

अधिक वाचा  मुस्लीमांचा जर काँग्रेससाठी फतवा तर हिंदू म्हणून आज मी सांगतो मुरलीधर मोहोळ यांना विजयी करा: राज ठाकरे

भाषणाच्या सुरुवातीला अर्थमंत्री काय म्हणाल्या?

अंतरिम बजेटच्या वाचनाला सुरुवात करताना निर्मला सीतारामन यांनी काही आकडेवारी जाहीर केली. त्या म्हणाल्या,

गेल्या 10 वर्षांत 25 कोटी लोकांना गरीबीतून मुक्त केलं

2047 भारताला विकसित राष्ट्र करू

78 लाख व्हेंडर्सना मदत

PM किसान सम्मान योजना 11.8 कोटी शेतकऱ्यांना

4 कोटींना पंतप्रधान पीक विमा

महिला उद्योजकांना 30 कोटी मुद्रा योजना कर्जं दिली

आशा कर्मचारी आणि अंगणवाडी कर्मचारी-मदतनीसांनाही आयुष्यमान भारत योजनेंतर्गत आरोग्यविमा

लोकांचं उत्पन्न गेल्या 10 वर्षांत वाढलं, त्यातुलनेत महागाईत किरकोळ वाढ झाली

सर्व पायाभूत सेवा प्रकल्प वेळेवर पूर्ण होत आहेत.

टॅक्सचा परीघ वाढवला

कठीण काळात G20चं अध्यक्षपद भूषवलं.

GST मुळे एक देश, एक बाजारपेठ, एक कर प्रत्यक्षात आणलं

अधिक वाचा  दाभोलकर हत्या प्रकरणात दोघांना जन्मठेप! तिघे निर्दोष; हत्या प्रकरणाचा मास्टरमाईंड वीरेंद्र तावडे मात्र निर्दोष मुक्त

पंतप्रधान आवास योजना

पीएम आवास योजनेतून महिलांना 70 टक्के घरं दिली

पीएम आवास योजना – ग्रामीण – 3 कोटी घरांचं उद्दिष्ट पूर्ण करण्याच्या जवळ

पुढच्या 5 वर्षांत आणखी 2 कोटी घरं बांधणार

शेतकऱ्यांना काय दिलं?

निर्मला सीतारामन म्हणाल्या, आमच्या सरकारने पिक विमा य़ोजनेचा 4 कोटी शेतकऱ्यांना लाभ दिला. शेतकऱ्यांच्या कमाईत वाढ होण्यासाठी प्रयत्न केला जात आहे. गरीबांची स्थिती सुधारणं हे आमचं ध्येय आहे.

शेतकऱ्यांसाठीची MSP वाढवली

ग्रामीण भागातलं उत्पन्न वाढलं

सर्वांगीण, सर्वसमावेशी प्रगती

गरीब, महिला, युवा, अन्नदाता यांच्या सशक्तीकरणावर लक्ष केंद्रित केलं, तेच प्राधान्य

तेलबियांच्या उत्पादनात स्वावलंबी होण्यासाठी प्रयत्न करणार

आयुषमान भारत योजना सर्व आशा सेविकांना देण्यात येणार

सर्व्हायकल कॅन्सर लस – 9 ते 14 वयोगटातल्या मुलींना लस देण्याचा प्रयत्न