पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या (शनिवारी) अयोध्या दौऱ्यावर जाणार आहे. राम मंदिराच्या उद्घाटनापूर्वी इथं सुरु असलेल्या तयारीचा ते आढावा घेणार आहेत. यासाठी या नगरीला १६ हजार कोटींच्या विकास कामांचं पॅकेज मिळणार आहे. पंतप्रधानांच्या या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर अयोध्येत सुरक्षेच्या कारणासाठी मोठ्या प्रमाणावर पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे

कोणत्या विकासकामाची उद्घाटनं होणार?

पतंप्रधानांच्या दौऱ्यात विमानतळ, हायवे, रेल्वे स्टेशन आणि रेल्वे मार्गाचं दुपदरीकरण या महत्वाच्या वाहतूक यंत्रणांच्या पायाभूत सुविधा अयोध्येत विकसित केल्या जाणार आहेत. यामध्ये रामजन्मभूमी मंदिराशी संबंधित विकासकामांवर विशेषतः लक्ष केंद्रीत केलं जाणार आहे.

अधिक वाचा  शिरुरमध्ये मतदानाला थंडा प्रतिसाद; पुण्यातील कसबा मतदारसंघात सर्वाधिक मतदान; राजकीय ड्रामेही सुरूच!

यावेळी चार प्रमुख मार्गांचं लोकार्पणही होणार आहे. त्याचबरोबर यामध्ये उत्तर प्रदेशातील काही योजनांचा समावेश आहे. मोदींच्या या अयोध्या दौऱ्याला मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अविस्मरणीय समारंभ बनवण्याचे निर्देश दिले आहेत.

पंतप्रधान करणार संबोधित

मुख्यमंत्र्यांनी म्हटलं की, या विशेष प्रसंगी पंतप्रधान मोदी जनतेला संबोधित करतील. या सभेला सुमारे २ लाख लोक हजेरी लावू शकतात. यावेळी गर्दीच्या नियंत्रणावर लक्ष केंद्रीत केलं जाईल. सभास्थळी आणि इतर प्रमख स्थळांवर तज्ज्ञांची नियुक्ती केली जातात. सुरक्षेच्या दृष्टीनं हवाई पाहाणी देखील होणार आहे.

‘या’ योजनांचं होणार भूमिपूजन

मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम एयरपोर्ट- 1463

अधिक वाचा  चालत्या बसला एक्सप्रेस-वे वर आग, 8 भाविक भक्त जिवंत जळाले; 24 जण गंभीर थरकाप उडवणारा व्हिडिओ

अयोध्या-जगदीशपुर महामार्ग- 2185

जौनपुर-बाराबंकी रेल्वे लाइन दुपदरीकरण – 1919

मल्हौर ते डालीगंज दुपदरीकरण विद्युतीकरण- 200

राम पथ- 844.93

भक्तपथ- 68.04

धर्म पथ – 65.40

एनएच-27 बाईपास से रामजन्मभूमि हायवे- 44.98

बड़ी बुआ रेल्वे ओव्हरब्रीज- 74.25

अयोध्या रेलवे स्टेशन पहिला फेज-241

राजर्षि दशरथ मेडिकल कॉलेज – 245.64

या योजनांसह एकूण ३१ योजनांचा या समावेश आहे.