इस्रायल-हमास युद्धामुळे गाझा पट्टीत भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. इस्रायलकडून गाझा पट्टीत सतत बॉम्ब वर्षाव सुरु आहे. दहशतवाद्यांबरोबर गाझा पट्टीत अनेक निरपराध नागरिक मारले जात आहेत. इस्रायलच्या हवाई हल्ल्यात दररोज मृत्यूमुखी पडणाऱ्यांची संख्या खूप मोठी आहे. गाझा पट्टीत मृतदेह दफन करण्यासाठी दफनभूमीची जागा अपुरी पडत आहे. इस्रायलच्या हवाई हल्ल्यात मारल्या जाणाऱ्या पॅलेस्टिनींना ठेवण्यासाठी आईस्क्रीमच्या फ्रीझर ट्रकचा वापर करण्यात येत आहे. हे मृतदेह हॉस्पिटलध्ये ठेवणं धोकादायक आहे तसेच दफनभूमीतही जागा राहिली नाहीय. हमासच्या नियंत्रणाखाली गाझा पट्टीतील आरोग्य अधिकाऱ्यांनी ही माहिती दिलीय. हमासने मागच्या आठवड्यात इस्रायलवर इतिहासातील भीषण दहशतवादी हल्ला केला. अनेक निरपराध नागरिक यात मारले गेले. मृतांचा आकडा 1300 पेक्षा जास्त आहे. आता इस्रायलने बदल्याची कारवाई सुरु केली आहे. इस्रायलकडून गाझा पट्टीत दररोज हवाई हल्ले सुरु आहेत.

अधिक वाचा  भोसरीकरांचा एकच निर्धार, आढळराव पाटील पुन्हा खासदार

“गाझापट्टीत जी हॉस्पिटल आहेत, त्या शवागारात फक्त 10 मृतदेह ठेवता येऊ शकतात. त्यामुळे आईस्क्रीम फॅक्टरीतून आम्ही आईसस्क्रीम फ्रिझर आणलेत” असं डॉ. यासेर अली यांनी सांगितलं. शुहादा अल-अक्सा हॉस्पिटलमध्ये ते काम करतात. या फ्रिझर ट्रकच्या बाहेरच्या बाजूला मुल आईस्क्रीमचा आनंद घेत असल्याच्या जाहीरातील आहेत. सुपरमार्केटमध्ये या ट्रकमधून आईस्क्रीम पोहोचवली जायची. आता इस्रायल-हमास युद्धात ठार झालेल्या मृतदेहांची ने-आण या ट्रकमधून केली जातेय. इस्रायलच्या एअर स्ट्राइकमध्ये आतापर्यंत गाझा पट्टीत 2300 जणांचा मृत्यू झाला आहे. अनेक लहान मुलांनी आपले प्राण गमावलेत. 10000 लोक जखमी झालेत. वैद्यकीय उपचारांमध्ये रुग्णालय कमी पडतायत. वाढत्या जखमींना सामावून घेण्यासाठी संघर्ष करावा लागतोय.

अधिक वाचा  प्रीतमताईची काळजी करू नका, मी तिला नाशिकमधून उभी करेन; पंकजा मुंडेंचं आश्वासन

‘….तर आम्ही मृतदेहाच दफन सुद्धा करु शकणार नाही’

“रुग्णालयातील शवागार, फ्रीझर ट्रक सुद्धा कमी पडतायत. गाझा पट्टीत 20 ते 30 मृतदेह तंबूमध्ये ठेवण्यात आले आहेत. गाझा पट्टी संकटात आहे. हे युद्ध असच सुरु राहिलं, तर आम्ही मृतदेहाच दफन सुद्धा करु शकणार नाही. दफनभूमी भरुन गेली आहे. आम्हाला दफन करण्यासाठी नव्या जागेची गरज आहे” असं अली यांनी सांगितलं.