उडुपी (कर्नाटक) : सत्तेत आल्यास महिलांना राज्य परिवहन मंडळाच्या बसमध्ये मोफत प्रवास देण्याचे आश्वासन काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी गुरुवारी येथे दिले.काँग्रेसतर्फे देण्यात आलेली ही पाचवी गॅरंटी आहे. मच्छीमारांसाठी १० लाख रुपयांचे विमा संरक्षण, मच्छीमार महिलांना एक लाख रुपयांचे बिनव्याजी कर्ज आणि मच्छीमारांना डिझेलवर अनुदान देण्याचे आश्वासनही त्यांनी दिले. या सर्व आश्वासनांची अंमलबजावणी पहिल्या कॅबिनेट बैठकीत केली जाईल.,’ असे ते म्हणाले.

ही दोन विचारसरणींमधील लढाई आगामी निवडणुका ही दोन विचारसरणींमधील लढाई असल्याचे सांगून गांधी म्हणाले, काँग्रेस गरीब आणि दलितांसाठी काम करील. राज्यातील सध्याचे भाजप सरकार हे जनतेने निवडून दिलेले नाही आणि त्या पक्षाने आमदारांना विकत घेण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च केले, हे सत्य कर्नाटकातील सर्वांना माहीत आहे. भाजपचे आमदारही आता मुख्यमंत्रिपद २५०० कोटी रुपयांना विकले जात असल्याचे सांगत आहेत.

अधिक वाचा  उद्योगांच्या विकासाला चालना देऊन बेरोजगारीची समस्या सोडविणार: मोहोळ