प्रभाग क्र. १० भुसारी कॉलनी येथील स्वा.वि.दा सावरकर मैदान येथील वापरात नसलेल्या जागेवर नगरसेविका सौ. अल्पना गणेश वरपे यांच्या संकल्पनेतून व विकासनिधीतून स्वा.वि.दा.सावरकर बालोद्यान साकारले गेले असून त्याचा लोकार्पण सोहळा खडकवासला विधानसभा मतदारसंघाचे आमदार मा. भिमरावआण्णा तापकीर यांच्या शुभहस्ते नुकताच पार पडला. सदर ठिकाणी लहान मुलांकरीता जंपिंग जॅक, खेळणी, खाऊवाटप कार्यक्रम आयोजित केला होता. या बालोद्यानात खेळणी,कार्टुन्स यांबरोबरच समुद्राच्या बीच वरील माती देखील असल्याने बाल-गोपाळांनी मातीत खेळण्याचा आनंद देखील लुटला.

या प्रसंगी कचर्‍याचे साम्राज्य असलेल्या जागेवर अतिशय उत्कृष्ट असे बालोद्यान झाले आहे .तसेच गेल्या पाच वर्षात विविध विकासकामांबरोबरच अनेक वर्षापासून रखडलेली कामे म्हणजेच भुसारी काॅलनीतील ओपन प्लाॅट ताब्यात घेऊन विकसित करणे, रखडलेले डीपी रस्ते खुले करणे हि कामे देखील पाठपुरावा करून नगरसेवकांनी मार्गी लावली असे आमदार भिमरावआण्णा तापकीर यांनी बोलताना सांगीतले.तसेच भाजपच्या काळात या भागाच्या वाहतुकीच्या दृष्टीने महत्वाचा असणार्‍या चांदणी चौकातील उड्डाणपूलाचे काम,मेट्रोस्टेशनचे काम प्रगतीपथावर आहे याचा देखील त्यांनी उल्लेख केला.

अधिक वाचा  महाराष्ट्रात काँग्रेस आणि राष्ट्रवादीला किती जागांवर विजय मिळणार? शरद पवारांनी थेट आकडाच सांगितला

कार्यक्रमाच्या संयोजिका नगरसेविका सौ.अल्पना वरपे यांनी देखील मागील काळात केलेल्या विकासकामांचा म्हणजेच भुसारी काॅलनी येथील स्वा.वि.दा सावरकर मैदान,पं.भीमसेन जोशी उद्यानातील कलादालन व विविध विकासकामे, उजवी भुसारी कॉलनी येथील ताब्यात घेतलेले ओपन स्पेस, डावी भुसारी कॉलनी येथील शृंगेरीमठा जवळून वारजे कडे जाणारा सर्ह्विस रोड,आशिष गार्डन डीपी रोड मार्गी लावल्याच उल्लेख केला. तसेच कोरोना सारख्या संकटात दोन वर्ष मर्यादित निधी मिळून देखील अनेक कामे मार्गी लावली.

तसेच प्रभागात विशेषतः वस्ती विभागात धान्याचे कीट,मास्क,सॅनिटायझर,फवारणी,हाॅस्पीटल,लसीकरण बाबतीत नागरिकांना कर्तव्य म्हणून लोकप्रतीनिधी नात्याने शक्य तेवढी मदत करण्याचा प्रयत्न केला असे सांगीतले.

अधिक वाचा  मोदींची 22 श्रीमंतांना वाचवण्याची तडफड अन् मला  90% जनतेच्या चेहऱ्यावर आनंद आणायचाय: राहुल गांधी

यावेळी प्रमुख उपस्थितांमध्ये नगरसेवक दिलीप वेडेपाटील, नगरसेवक किरण दगडेपाटील, अॅड. गणेश वरपे, स्विकृत सदस्य बाळासाहेब टेमकर, गोरख दगडेपाटील, प्रभाग अध्यक्ष सागर कडू, कैलास मोहोळ, राजाभाऊ जोरी, अभिजीत राऊत, अक्षय ढाकणे, गणेश कोकाटे, मयूर कांबळे, प्रदिप जोरी, सुरेंद्र कंधारे, राजेश मनगिरे, कृष्णा भंडारी, शंतनु नारके, किरण म्हसवडे, तुषार धामंदे, रूपेश भोसले, राजीव निगडीकर, अभिजीत धुमाळ, अजय भरेकर, संतोष महाजन, सिद्धेश कवडे, अभिजित ठाकूर, अजित शिगवण, विजय राठोड, अमोल शिर्के, रोहित जाधव आदि भाजपा पदाधिकारी तसेच कांचनताई कुंबरे, सोनियाताई महाजन, सुप्रियाताई माझिरे, राजश्रीताई मुरकुटे, जान्हवीताई जोशी, अमरजाताई पटवर्धन, सुहासिनीताई शिराढोणकर, आरतीताई मुरकुटे आदि भाजपा महिला पदाधिकारी, सवंगडी ज्येष्ठ नागरीक संघाचे पदाधिकारी व मान्यवर नागरीक उपस्थित होते.

अधिक वाचा  नाशिकमध्ये अर्ज भरुन खळबळ उडवणाऱ्या शांतीगिरी महाराजांची संपत्ती किती? वाढीचा वेग डोळे विस्फारतील 

सदर कार्यक्रमात मा.सागर कडू यांनी सूत्रसंचालन केले व मा.कैलास मोहोळ यांनी आभार मानले.