पुणे पोलीस उपायुक्त सन्मा. गिल साहेब यांची पतित पावन च्या शिष्टमंडळाने भेट घेऊन पुणे शहरात बेकायदा वास्तव्य करणाऱ्या महम्मद अन्सारी नामक पाकिस्तानी तरुणास पकडल्याबद्दल पुणे पोलीस दलाचे अभिनंदन आणि आभार व्यक्त केले. पोलीस यंत्रणेच्या दक्ष आणि चौकस यंत्रणेमुळे आपल्या सुसंस्कृत पुण्यात बनावट पारपत्र बाळगून बेकायदा वास्तव्य करणाऱ्या महम्मद अन्सारी नामक युवकास जेरबंद करण्यात आले. परंतु एक पाकिस्तानी नागरिक बनावट पारपत्र बाळगून पुण्यात राहणे हि बाब सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत गंभीर असून त्या युवकाची कसून चौकशी करण्यात यावी. तसेच तो ज्या भागात वास्तव्यास होता त्या भागातील कोणी त्यास आसरा दिला होता का? हि बाब पण लक्षात घेऊन त्यासंबंधाने चौकशी करण्यात यावी. पुणे शहरात याआधी हि दहशतवादी हल्ले झालेले आहेत त्यामुळे त्याने पुणे शहराची रेकी केली आहे काय याबाबत पुणेकर नागरिकांच्या मनात भीती असून त्याचा बेकायदा वास्तव्य करण्याचा नेमका उद्देश शोधून त्याला मदत करणाऱ्यांना पण खाकी चा हिसका दाखवावा जेणेकरून आपल्या पुण्याचं स्वास्थ्य बिघडवणाऱ्यांना जरब बसेल . अश्या स्वरूपाचे निवेदन गिल साहेबांना देण्यात आले.
यावेळी पतित पावन संघटनेचे प्रांत उपाध्यक्ष राजाभाऊ पाटिल प्रांत संघटक सीताराम खाड़े, जिल्हाध्यक्ष दिनेश भिलारे, शहाराध्यक्ष स्वप्निल नाईक, कामगार महासंघ रविंद्र भांडवलकर, यादव पुजारी, कसबा अध्यक्ष योगेश वाडेकर कोथरुड़चे राहुल शिंदे राजाभाऊ राजपूत आदि सभासद उपस्थित होते.