कसबा पेठ आणि चिंचवड या दोन्ही विधानसभा मतदारसंघांतील पोटनिवडणुकांच्या निमित्ताने भाजप आणि महाविकास आघाडीच्या दिग्गज नेत्यांनी गेल्या पंधरा दिवसांपासून तळ ठोकला आहे. तर आज प्रचाराचा अखेरचा दिवस असल्याने दोन्ही मतदारसंघात चांगलेच वातावरण तापले आहे.

कसब्यात भाजप विरूद्ध काँग्रेस असा थेट सामना होत आहे. भाजपकडून संपूर्ण मंत्रिमंडळ प्रचारासाठी आणल जात आहे. सोबतच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील गेल्या दोन-तीन दिवसांपासून पुण्यात तळ ठोकून आहेत. दरम्यान ही बातमी भाजपला धक्का देणार आहे. कसबा पोटनिवडणुकीत चक्क भाजपचा पदाधिकारी महाविकास आघाडीचे उमेदवार रविंद्र धंगेकर यांचा प्रचार करत असल्याची कबुली दिली आहे. या पदाधिकाऱ्याचे नाव नवनाथ रानगट असून ते पंढरपूरमधील परिचारक गटाचे पदाधिकारी आहेत.

अधिक वाचा  तिरुपती बालाजीच्या चरणी 11 टन सोनं अन् 18 हजार कोटी

एका वृत्तवाहिनी भाजप पदाधिकाऱ्याला विचारलं काँग्रेस उमेदवार धंगेकर यांचा प्रचार का करत आहे, ते म्हणाले की, “रविंद्र धंगेकर हे आमचे जवळचे नातेवाईक आहेत, तसेच पंढरपूर आणि लगतच्या गावातील मुले शिक्षणासाठी पुण्यात आहेत त्यांना ते मदत करतात. तसेच हॉस्पिटलची काही अडचण असल्यावर धंगेकर सोडवतात. त्यामुळे त्यांचा प्रचार करत आहे. मात्र मी भाजपचाच आहे आणि प्रशांत परिचार यांचा कट्टर समर्थक देखील आहे” अशी प्रतिक्रिया या पदाधिकाऱ्याने दिली आहे.