मोरगाव ग्रामपंचायत निवडणुकीच्या माध्यमातून सध्या राजकारण करण्यापेक्षा विकासात्मक समाजकारण करण्यासाठी आजपर्यंत केलेले कार्य म्हणजे ही नाळ मोरगावची…. सुपुत्र नात्यानेच हे कार्य?; असून विकासाचे राजकारण ग्रामस्थांना कदम यांनी आवाहन केले आहे. आपल्या गावातून आपण स्वतः समुद्राच्या पुढे जरी गेलो, तरी शेवटी आपली नाळ ही आपल्या मातीशी जोडलेली असते. ज्या माणसांमधून आपण समाजात येतो, राहतो आणि वावरतो त्या सामाजिक ऋणातून मुक्त होण्यासाठी एस एम के फाउंडेशन ची स्थापना करण्यात आली आहे.

आजवरच्या सामाजिक कार्यामध्ये विविध उपक्रमात काम केले. प्रामुख्याने कुठल्याही नैसर्गिक अथवा कृत्रिम आपत्तीमध्ये स्वतः धावून जात असताना अंकलखोप जिल्हा सांगली या ठिकाणी पूरग्रस्तांना पूरस्थितीच्या वेळी जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करून, शालेय विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्याचे वाटप करून त्यांना धीर देण्याचा प्रयत्न केला. जागतिक ख्याती आणि नावलौकिक असणाऱ्या सिरम इन्स्टिट्यूट , पुणे या कंपनीकडून सीएसआर फंडमार्फत १.३२ कोटी निधी मिळवून पुरंदर उपसा सिंचन योजनेतर्गत शेतकऱ्यांसाठी शेतीला पाणीपुरवठा करण्यासाठी पाईपलाईनचे काम केले. त्यामुळेच, ढोलेमळा, तावरेवस्ती, चोपणवस्ती पाटीलबुवा मळा, हनुमाननगर व इतर परिसरातील शेतकऱ्यांना शेतीसाठी कायमचा पाण्याचा प्रश्न सोडविता आला. श्रीक्षेत्र मोरगाव ते हडपसर अशी पीएमपीएल बस सेवा सुरूकरण्यासाठी सातत्याने घेतलेल्या पाठपुराव्यामुळे श्रीक्षेत्र मोरगाव मधील अनेक व्यापारी, महिला,नोकरदार वर्ग,जेष्ठ नागरिक, विद्यार्थ्यां आदींची सोय करण्याची संधी मला मिळाली. करोनासारख्या जागतिक महामारीमध्ये मोरगाव मधील नागरिकांची घरोघरी जाऊन तपासणी, रुग्णवाहिका आदी सेवा उपलब्ध करून देण्याची संधी मिळाली. त्याचप्रमाणे अत्यावश्यक असणाऱ्या रुग्णांसाठी पुणे येथील नामांकित हॉस्पिटलमध्ये बेड उपलब्ध करून देणे,अनेकांची बिल कमी करणे इत्यादी कामातून मोरगाव वासियांची सेवा करता आली. मोरगाव मधील प्रत्येक विद्यार्थी हा उच्चशिक्षित होवा यासाठी पुण्यामधील नावलौकिक असणाऱ्या विविध संस्थेमध्ये प्रवेश मिळवून दिला. मोरगाव मधील शिक्षित असणाऱ्या रिकाम्या हातांना काम देण्यासाठी तरुणांना त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार नोकरी मिळून दिल्या आणि देण्याचा सातत्याने प्रयत्न चालू आहे. असे अनेक उपक्रम अहोरात्र चालू आहेत. ज्या उपक्रमाचा समाजातील प्रत्येक घटकाला फायदा व्हावा यासाठी मी कायमस्वरूपी कटिबद्ध असणार आहे.

अधिक वाचा  मुरलीधर मोहोळ यांचे प्रभाग 13मध्ये जंगी स्वागत; स्थानिक नागरिकांची उत्साही गर्दी