पुणे : शहरातील रस्त्यांचे डांबरीकरण आणि सिमेंट काँक्रिटीकरण करण्यासाठी अखेर पुणे महापालिकेने १९३ कोटींची अल्प मुदतीची निविदा काढली आहे. यामध्ये शहरातील प्रमुख ५० रस्ते विविध १४० ठिकाणी खरडून काढून पूर्णपणे डांबरीकरण केले जाणार आहे, तर काही सिमेंटचे रस्ते असून, त्यावर सहा इंचाचा नवा थर टाकला जाणार आहे. या रस्त्यावर भविष्यात कोणतेही खोदकाम होणार नाही, यासाठी प्रशासनाने नियोजन केले आहे.

शहरात २०२३ मध्ये ‘जी २०’ ही आंतरराष्ट्रीय परिषद होणार आहे. त्यादृष्टीने प्रशासनाने तयारी सुरू केली आहे. पथ विभागाने केलेल्या सर्वेक्षणानंतर पहिल्या टप्प्यात १४० किलोमीटर लांबीचे डांबरीकरण केले जाणार आहे. त्यासाठी १९३ कोटी ४७ लाख ११ हजार ६८६ रुपये इतका खर्च येणार आहे. त्यासाठी निविदा मागविल्या असून, पुढील १५ दिवसांत निविदा प्राप्त झाल्यानंतर त्यांची कागदपत्रांची तपासणी व स्थायी समितीच्या मान्यतेनंतर लगेच डांबरीकरण सुरू होईल. पुढील सहा महिन्यांत हे सर्व काम संपणार आहे.

अधिक वाचा  प्रतिष्ठेच्या कोल्हापुरातही नरेंद्र मोदींचाही आवाज गुंजणार; विराट सभेत 2 लाख नागरिक सहभागी होतील: मुश्रीफ

असे होणार रस्ते चकाचक

व्हिज्युअल इन्स्पेक्शन व रेपो मीटरद्वारे रस्त्यांचे सर्वेक्षण

५० रस्ते १४० ठिकाणी खराब, त्यांची लांबी १४८ किमी इतकी

महत्त्वाचे जोड रस्ते, वर्दळ, रस्त्यावरील वाहतूक व सद्यःस्थितीचा विचार करून ५० रस्त्यांची

निवडसात रस्‍ते काँक्रिट व यूटीडब्ल्यूटी व ४३ रस्त्यांवर डांबरीकरण होणारतीन प्रकारांत

रस्त्यांची विभागणी

पुढील १५ वर्ष रस्ते चांगले राहतील. ज्या ठिकाणचे डांबरी रस्ते खराब झाले आहेत, तेथील भाग खरडून काढून डांबरीकरण केले जाईल. हे सर्व काम चांगल्या गुणवत्तेने झाले पाहिजे, यासाठी लक्ष ठेवले जाणार आहे. ही कामे त्रयस्थ संस्थेकडून तपासली जातील.

अधिक वाचा  नाशिकला ना भुजबळ, ना गोडसे; दोघांच्या भांडणात यांना उमेदवारीचा लाभ! मराठा समाजही राहणार सोबत?

– विक्रम कुमार, आयुक्त, महापालिका