बंडखोरी केल्यानंतर शिवसेनेशी आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी कडवटपणा न घेता त्यांच्याशी चांगले संबंध हे सुधारण्याचा सर्वच आमदारांनी प्रयत्न केला होता. त्यातच आता शिंदे गट आणि शिवसेना हे एकत्र येण्याची तसूभरही शक्यता नसल्यामुळे बंडखोर आमदारांनी यापद्धतीने निर्णय घेत आहेत.

40 आमदार बंडखोरी करण्याआधी शिवसेना आमदारांच्या कार्यलयात शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचे फोटो लावलेले होते. पण आता बदलत्या राजकारणानंतर यामध्ये बदल करण्यात आला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या फोटोची जागा आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या फोटोने घेतली आहे. यापूर्वी हा बदल औरंगाबादमध्ये समोर आला होता तर आता सिंधुदुर्गातील दीपक केसरकर यांच्या कार्यालयातही हा बदल दिसून आला आहे.

अधिक वाचा  पुणे काँग्रेस शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांच्या नावे बोगस मतदान; मतदान अधिकाऱ्यांवर दमदाटीचाही आरोप

बाळासाहेबांचे विचार जोपासण्यासाठी या 40 आमदारांनी बंडखोरीचा निर्णय घेतला होता. त्यामुळे ठाकरे कुटुंबातील इतरांचे फोटो काढून त्याजागी केवळ बाळासाहेब ठाकरे यांच्या फोटोला स्थान देण्यात आले आहे. चार महिन्यानंतर हा बदल केसरकर यांनी आपल्या कार्यालयामध्ये केला आहे.

पूर्वीच्या फलकावर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांची छायाचित्र हे ठरलेलीच असायची. मात्र, आता बंडखोर आमदारांच्या कार्यालयावरील फलकावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पंतप्रधान नरेंद्र मोदी, आनंद दिघे यांचे फोटो आहेत.