पुणे – स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वतंत्रपणे लढवाव्यात ही काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची भूमिका मान्य आहे. पण प्रत्येक ठिकाणची परिस्थिती वेगळी असल्याने तेथे आघाडी करावी की नाही याचा निर्णय आम्ही पक्षाचे नेते एकत्र बसून घेऊ, असे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी स्पष्ट केले.

पुणे दौऱ्यावर असताना संजय राऊत यांनी पत्रकारांशी संवाद साधला त्यावेळी बोलत होते. राऊत म्हणाले, ‘‘कसबा विधानसभा मतदारसंघाची राज्यात काय होणार याचे चित्र दाखवणारी आहे. चिंचवडला राहुल कलाटे यांना उमेदवारी दिली नाही ही चूक झाली, त्यांना उमेदवारी द्यायला हवी होती. पुढच्या विधानसभा आणि लोकसभा आम्ही एकत्र लढविण्याचा निर्णय घेतला आहे.

अधिक वाचा  गुजरात टायटन्सने जिंकला नाणेफेकीचा कौल, शुबमन गिल गोलंदाजी घेत दिली गूड न्यूज

विधानसभेच्या २०० जागा आणि लोकसभेत ४० जागा जिंकू शकतो. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आघाडी न करण्याचा निर्णय भूमिका मान्य आहे. स्थानिक निवडणुकांमध्ये तेथील समीकरणे, परिस्थिती वेगळी असते, त्यामुळे त्याचा निर्णय स्थानिक पातळीवर घ्यावा लागेल. पण जेथे आवश्‍यकता असले तेथे तिन्ही पक्षाचे नेते एकत्रित बसून चर्चा करतील. हक्कभंग नोटीसवर राऊत म्हणाले, ‘मी विधिमंडळाचा आदर करतो, सध्या दौऱ्यावर असल्याने मला अजून नोटीस मिळालेली नाही, ती पाहिली देखील नाही. पण विधीमंडळात ४० आमदार जी भाषा वापरतात त्यावर कारवाई व्हायला हवी. अजून राज्यात काही प्रमाणात कायद्याचे राज्य आहे. मनसेचे नेते संदीप देशपांडे यांच्यावर झालेल्या हल्ला प्रकरणात गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लक्ष घालावे अशी भूमिका राऊत यांनी घेतली.

अधिक वाचा  दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावर वेगवेगळ्या विविध पातळींवरुन कारवाई; ‘या’ शिफारशींमुळे रुग्णालय मोठ्या अडचणीत