साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या १०२ व्या जयंतीनिमित्त पुणे शहर व जिल्हा मातंग समाजाच्या वतीने उत्कृष्ट सामाजिक कार्याकरिता देण्यात येणारा आदर्श कार्यकर्ता म्हणुन विर फकिरा पुरस्कार विजयबापु डाकले यांना जयंतीनिमित्त आयोजित भव्य कार्यक्रमात सारसबाग पुणे या ठिकाणी प्रमुख पाहुणे श्रीमंत छत्रपती संभाजी राजे भोसले यांच्या हस्ते हजारो समाजबांधवांच्या ऊपस्थितीमध्ये देण्यात आला. विजयबापु डाकले हे गेली ३० वर्षापेक्षा जास्त काळ सामाजिक क्षेत्रात काम करत असुन दलित, पिडीत, वंचित समाजाकरिता सातत्याने लढणारा कार्यकर्ता म्हणुन त्यांची ओळख आहे. आद्यक्रांतीगुरु लहुजी साळवे स्मारकाच्या अध्यक्षपदीची जबाबदारी मा. ना. अजितदादा पवार यांनी बापुंवर सोपवल्यापासुन त्यांनी शासन दरबारी सातत्य पाठपुरावा केला. या पाठपुराव्याला यश आले. तत्कालीन ऊपमुख्यमंत्री मा. अजित पवार यांनी विजयबापु आणि समिती सदस्यांनी केलेली मागणी मान्य करुन १०० कोटींच्या भरघोस निधीची तरतुद केली. यांतील अडचणी दुर करुन स्मारकासाठीची आरक्षित जागेचा अधिकृत ताबा घेतला, स्मारकाचा भव्यदिव्य आराखडा बनवुन घेतला. महिला समृध्दी योजनेच्या माध्यमातुन २७०० महिलांना स्वयंरोजगारासाठी प्रत्येकी ५०,००० रुपयांचे अनुदान किंवा वाल्मिकी आंबेडकर योजनेच्या माध्यमातुन राबवलेली मोफत घर योजना असेल समाजाने याची दखल घेतली असेच म्हणावे लागेल.
आज झालेल्या कार्यक्रमासाठी श्रीमंत छत्रपती संभाजी राजे भोसले यांच्यासह पुणे शहर जिल्हा मातंग समाजाचे सचिव मा विकास सातारकर, स्वागताध्यक्ष शंकर शेंडगे, सदाभाऊ ढावरे, श्री. भगवानराव वैराट, साहित्यिक संपतराव जाधव, लक्ष्मण तांदळे, अजित ईंगळे, वैजनाथ वाघमारे, रामभाऊ कसबे, परमेश्वर लोंढे, शाम ढावरे, शंकर तेलंगे, अशोक जाधव, कैलास कदम यांच्यासह हजारो समाजबांधव हजर होते.

अधिक वाचा  काहीही करा फक्त गर्दी जमवा! सभेला चला, सभेला चला शहरात फलक sms अन् फोन तरी नेत्यांची होतेय दमछाक