कैवल्य सम्राट चक्रवर्ती संत शिरोमणी श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा दिंडी क्रमांक 240 यांचे मोठ्या थाटामाटात कर्वेनगर हिंगणे होम कॉलनी सभागृहात आगमन झाले दिनांक 22 ते 24 जून पर्यंत सदर दिंडीचे अडीचशे वारकरी सभागृहात मुक्कामासाठी आलेले होते त्यांचे स्वागत तसेच मुक्कामासाठीची व्यवस्था राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पुणे शहर उपाध्यक्ष आनंद उर्फ बंडूशेठ तांबे यांच्या वतीने अतिशय उत्तम प्रकारे करण्यात आली होती. त्याचप्रमाणे संयोजन किंग ऑफ किंग्स ग्रुप, हिंगने होम कॉलनी विकास मंच यांच्या वतीने करण्यात आले. कार्यक्रमाचे आयोजन हरिभक्त परायण माननीय श्री रामराव कदम, श्री सोपानराव कावळे, श्री नामदेवराव कदम, श्री अशोकराव कदम यांच्या वतीने अतिशय उत्तम प्रकारे करण्यात आली होती चहा फराळ दोन वेळचे महाप्रसादाचे पंचपक्वान्नाचे जेवण उपवासासाठी खिचडी केली.
बिस्कीट, बिसलेरी याप्रमाणे दोन दिवस अतिशय उत्तम प्रकारे वारकऱ्यांची सेवा करण्यात आली, झिम्मा, फुगडी, फेर धरणे तसेच भजन-कीर्तन इत्यादी प्रकारच्या कार्यक्रमाचे खूप छान आणि उत्तम प्रकारे सादरीकरण करण्यात आले. परिसरातील महिला, पुरुष त्याचप्रमाणे वारकरी या सर्वांनी या सोहळ्याचा अतिशय छान आणि उत्तम प्रकारे लाभ घेतला. सर्व वातावरण आणि परिसर भक्तिमय झाले होते सदर कार्यक्रमास स्वप्नील जी दुधाने, जगदीश दिघे, संतोष जी बराटे, तेजस भागवत,सुरेशजी तोंडे, किशोर शेडगे, अमित गोडांबे व परिसरातील अनेक मान्यवरांनी भेट दिली आनंद तांबे यांनी दिंडीप्रमुख घुमरे दादा यांचा तुकाराम पगडी शाल श्रीफळ धोतर व हार घालून सत्कार केला. त्याचप्रमाणे साठ वारकऱ्यांना धोतर वाटप करण्यात आले. पुणे महानगरपालिकेचे आरोग्य निरीक्षक माननीय श्री अहिरे साहेब त्याचप्रमाणे परदेशी साहेब तसेच अमित साहेब आणि सर्व सफाई कर्मचारी वर्गाचा मान सन्मान करण्यात आला.
दिंडीतील सर्व वारकरी बांधव आणि भगिनी दोन दिवस केलेल्या उत्तम पाहूणचाराने आनंदित होऊन धन्यवाद व आशीर्वाद देऊन पुढच्या वर्षी पुन्हा येण्याचे आश्वासन देऊन जात होते. कार्यक्रमाचे संयोजन किंग ऑफ किंग ग्रुपचे संकेत शितोळे, स्वप्निल तांबे, रोहित गायकवाड, साहेब नलावडे अध्यक्ष शुभम तांबे व त्यांच्या सर्व सदस्यांनी केले.