एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडानंतर शिवसेनेत फूट पडली आहे, हा वाद आता सुप्रीम कोर्टात गेला आहे, कोर्टाने १२ जुलै पर्यंत बंडखोर आमदारांवर निलबंनाची कारवाई करता येणार नाही असे सांगितले आहे. या पार्श्वभूमीवर भाजपच्या कोअर कमिटीची आज बैठक पार पडली या बैठकीत शिवसेनेत पडलेल्या फूटीबाबात मंथन झाल्याची माहिती पक्षाचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे.

सुधीर मुनगंटीवार यांनी माध्यमांना सांगीतले की, सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावर भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीत मंथन झाले, तसेच या बैठकीत भाजपच्या भविष्यातील भूमिकेबाबात चर्चा झाल्याचे देखील ते म्हणाले. भाजपची सध्या वेट अँड वॉचची भूमिका घेतली असून राज्यातील अस्थिर राजकीय परिस्थीतीवर भाजपच बारीक लक्ष असून योग्य वेळी योग्य भूमिका घेतली जाईल यासोबतच भाजपकडे प्रस्ताव आल्यास विचार करून निर्णय घेणार असल्याचेही मुनगंटीवार यावेळी म्हणाले आहेत.

अधिक वाचा  मुंबई काँग्रेसला धक्का ; आणखी एक बडा नेता नाराज, स्टार प्रचारकपदाचा राजीनामाच देऊन टाकला

दरम्यान महाराष्ट्रात भाजप सत्तास्थापन करणार अशी चर्चा होतेय, यादरम्यान भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीत सरकार स्थापनेबाबत बैठकीत कोणतीही चर्चा नाही, असे मुनगंटीवार म्हणाले, बंडखोर स्वतःला शिवसैनिक मानत आहेत, मग बंडखोर कोण हे येणाऱ्या काळात कळेल, मी सेनेच्या कुठल्याही आमदाराला बंडखोर मानत नाही, शिंदेकडे 2/3 आमदार मग त्यांना बंडखोर कसं म्हणणार असेही ते म्हणाले आहेत. भाजप शिंदे यांच्या संपर्कात आहेत का? यावर शिवसेना गटनेते एकनाथ शिंदेंकडून कोणताही प्रस्ताव आलेला नाही, तसेच अविश्वास प्रस्ताव सध्या सादर करण्याची गरज वाटत नाही, असेही मुनगंटीवार यांनी स्पष्ट केलं.